प्रतिनिधी – गोरख देशमाने, परंडा.
दि. १९ एप्रिल – महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री व प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा. बच्चू कडू यांचा परंडा येथे प्रहार संघटना आणि दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
शनिवार, दि. १९ एप्रिल रोजी ते परंडा येथील शासकीय विश्रामगृहात आले असता, तालुक्यातील प्रहार संघटनेच्या विविध उपक्रमांबाबत तसेच दिव्यांग व्यक्तींना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी तालुका प्रहार संघटना व दिव्यांग उद्योग समूहाच्यावतीने बच्चू कडू यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर, परंडा शहराचे सुपुत्र व व्हॉईस ऑफ मीडिया जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश काशीद यांची बृहन्मुंबई महानगरपालिकेत सहाय्यक कार्यकारी अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही मा. कडू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास तालुका प्रहार संघटनेचे अध्यक्ष आप्पासाहेब तरटे, दिव्यांग उद्योग समूहाचे अध्यक्ष तानाजी घोडके, जिल्हा उपाध्यक्ष दिनेश गुडे, वैभव गायकवाड, तानाजी सोनवणे, शरद गोमासे, आकाश निरफळ, रासप तालुका अध्यक्ष मनोज पाडुळे, अनिकेत कुलकर्णी, दिव्यांग तालुका प्रमुख तानाजी सांगडे, स्वानंद कुलकर्णी आदींसह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपादक: रियाज पठाण
मो.: 9405749898 / 9408749898
स्टार माझा न्यूज, बार्शी

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.