स्टार माझा न्यूज परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने. परांडा दिनांक 5/4/2025 रोजी येथील शासकीय विश्रामगृह परंडा येथे चक्रवर्ती अशोक सम्राटांची जयंती साजरी करण्यात आली.
डी.बी.ए.समूहचे संस्थापक/ अध्यक्ष माननीय दयानंद बनसोडे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव मोहन दादा बनसोडे , डी बी ए मीडिया प्रमुख अमर गायकवाड ,जय मल्हार कामगार संघटनेचे भूम परंडा वाशी तालुकाप्रमुख मोहम्मद शेख, संजय सरवदे, यांच्या हस्ते सामुदायिक चक्रवती अशोक सम्राट यांच्या प्रतिमेचे दीप धूप लावून पूजन केले. याप्रसंगी चक्रवर्ती अशोक सम्राट यांच्या जीवनावर दयानंद बनसोडे, अडवोकेट दयानंद धेंडे, मोहन दादा बनसोडे, इत्यादींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थित दादा कोळी ,हरिभाऊ गोडगे छगन चौधरी, रवींद्र शिंदे, सम्यक धेंडे, सूर्योदय सरवदे, धर्मराज नरोटे,कालिदास काशीद, इत्यादी नागरिक उपस्थित होते. शेवटी मा.दयानंद बनसोडे यांनी आभार मानले.
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.










