बार्शी, दि. १८ (स्टार माझा न्यूज) – प्रसिद्ध लेखक सचिन वायकुळे लिखित ‘तिमिर छेदताना’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा येत्या रविवारी (दि. २३) सोलापुरातील डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात दुपारी २ वाजता होणार आहे.
अविष्कार फाऊंडेशन, कोल्हापूर यांच्या वतीने या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, भारत सरकारच्या मागासवर्गीय आयोगाच्या माजी सदस्या सुरेखा लांबतुरे आणि अविष्कार फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय पवार यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होईल.
कार्यक्रमास माजी सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक आर्वे, डॉ. अनिल देशमाने, जब्बार शिकलगार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सचिन वायकुळे यांनी लिहिलेल्या ‘तिमिर छेदताना’ या पुस्तकात एका अनाथ मुलाच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी जीवनप्रवासाचे चित्रण करण्यात आले आहे. हे त्यांचे सहावे पुस्तक असून, यापूर्वीही त्यांनी सामाजिक विषयांवर आधारित लेखन केले आहे.
स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.









