वैराग : संतनाथ साखर कारखाना आगीत भस्मसात; शेतकरी आणि कामगारांचे स्वप्न चुरडले

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898

वैराग, दि. ६ मार्च २०२५ : वैराग येथील संतनाथ साखर कारखाना आज सकाळी लागलेल्या आगीत पूर्णतः भस्मसात झाला. अनेक वर्षे बंद अवस्थेत असलेल्या या कारखान्याच्या पुनरुज्जीवनाची आशा बाळगून असलेल्या कामगार आणि शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर या आगीने अक्षरशः पाणी फेरले.

 

आग लागली की लावली? नागरिकांमध्ये चर्चेला ऊत

 

या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आग अचानक लागली की कुणी घातपात केला? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. काही लोकांनी कारखान्यातील लोह व इतर मौल्यवान साहित्य चोरीला गेल्याची शक्यता वर्तवली होती. त्यामुळे हा प्रकार नियोजनबद्ध होता का, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

काही वर्षांपासून बंद असलेल्या या कारखान्यामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळत नव्हता. बऱ्याच कुटुंबांनी उपजीविकेसाठी स्थलांतर केले होते. मात्र, कारखाना लवकरच पुन्हा सुरू होणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यामुळे अनेकांनी भविष्यातील आशा उराशी बाळगल्या होत्या. मात्र, आजच्या आगीत या सर्व आशा धुळीस मिळाल्या. धुराचे लोळ उसळताना पाहून कामगारांचे डोळे पाणावले.

 

स्थानिक प्रशासन आणि पोलीस घटनास्थळी दाखल

 

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करण्यात आले, मात्र कारखान्याचा मोठा भाग जळून खाक झाला. प्रशासनाने आगीचे कारण शोधण्यासाठी चौकशी समिती नेमण्याची घोषणा केली आहे.

 

स्थानिकांचा सरकारकडे मदतीचा आग्रह

 

या घटनेनंतर कामगार आणि शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आणि दुःख आहे. सरकारने या आगीची सखोल चौकशी करून कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!