बुधवारी परंडा बंद : संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ सकल बहुजन समाजाचा एल्गार.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने

यासोबतच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रस्ता रोको आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे. परंडा पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात, या प्रकरणाची सखोल चौकशी करून मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

सकल बहुजन समाजाचा संतप्त विरोध

संतोष देशमुख यांच्या हत्येने संपूर्ण परंडा तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. सामाजिक न्यायाची मागणी करताना बहुजन समाज बांधवांनी एकजूट दाखवली असून आरोपींना कठोर शासन न झाल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

बुधवारी परंडा बंदला व्यापारी, सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आणि स्थानिक नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. शहरातील जनजीवन ठप्प होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पोलीस प्रशासन अलर्टवर

रस्ता रोको आंदोलन आणि बंदमुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. शहरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!