गेंड्याची कातडी पांघरलेले प्रशासन जागं कधी होणार? परंडा रोडवरील चेंबर अपघातांना निमंत्रण देतोय!
बार्शी दिनांक 3 मार्च 2025 परंडा रोड वरून नागणे प्लॉट कडे जाणाऱ्या शंभर फूट (रोडवर)रस्त्यावर असलेला नगरपालिका प्रशासनाने केलेला मोठा चेंबर गेल्या तीन-चार महिन्यांपासून उघडाच आहे. हा चेंबर अत्यंत धोकादायक बनला असून, यामुळे अनेक नागरिक आणि शाळकरी मुले अपघातग्रस्त झाले आहेत.
अपघातांची मालिका सुरूच – प्रशासन निष्क्रिय
शाळकरी मुली आणि अन्य नागरिक यामध्ये अनेकदा पडले आहेत.
दुधाळ नावाचा व्यक्ती या चेंबर मध्ये सायकलवरून पडून गंभीर दुखापत झाली. त्याच्या पाठीच्या मणक्याला फ्रॅक्चर झाले आहे.
या मार्गावरून शेकडो शाळकरी मुले, नागरिक, वयोवृद्ध रोज जातात, त्यामुळे या चेंबरमुळे मोठा धोका निर्माण झाला आहे.
स्टार माझा न्यूजने वारंवार आवाज उठवूनही प्रशासनाचे दुर्लक्ष!
स्टार माझा न्यूज ने यापूर्वीही या गंभीर समस्येवर अनेकदा बातम्या प्रकाशित केल्या आहेत, मात्र तरीही प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. गेंड्याची कातडी पांघरलेले नीगरगट्ट प्रशासन या गंभीर विषयाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, भविष्यात कोणाचा जीव गेल्यास त्याला संपूर्णपणे नगरपालिका प्रशासन जबाबदार असेल, असे नागरिकांनी ठणकावून सांगितले आहे.
तत्काळ उपाययोजनांची मागणी
नागरिकांनी प्रशासनाकडे या धोकादायक चेंबरभोवती कटडे बसवण्याची आणि त्यावर झाकण बसवण्याची तातडीची मागणी केली आहे. भविष्यात आणखी मोठा अपघात होण्याआधी प्रशासनाने जागे होऊन उपाययोजना करावी, अशी नागरिकांची आग्रही मागणी आहे.
स्टार माझा न्यूज आपल्या भागातील समस्या, अन्याय आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेवर आवाज उठवत राहील. आपल्यालाही अशाच कोणत्याही समस्येची माहिती द्यायची असल्यास आमच्याशी संपर्क साधावा. स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.