स्टार माझा न्यूज परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने
परांडा प्रतिनिधी दिनांक 3 महात्मा गांधी विद्यालय परंडा येथे चिमुकल्यांनी विविध वस्तूंची दुकाने थाटून व्यापार कसा करावा हे आज सिद्ध करून दाखवले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता अण्णा साळुंखे, परंडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री इज्जपवार साहेब, शिवसेना तालुकाप्रमुख मेघराजदादा पाटील, बानगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री भाऊसाहेब खरसडे, राष्ट्रवादी शहर प्रमुख श्रीहरी नाईकवाडी, पैलवान माऊली गोडगे, जनार्धन मेहेर साहेब, नंदू शिंदे, माजी मुख्याध्यापक शेरे सर अनेक पालक, तसेच अनेक महिला पालकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावून या छोट्या व्यापाऱ्यांचा उत्साह द्विगुणीत केला.

या सर्व मान्यवरांचे स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री रणजीत घाडगे, पर्यवेक्षक श्री काशीद सर व विद्यालयातील सर्वच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहात केले.
यावेळी सर्वच मान्यवरांनी, पालकांनी ,विद्यार्थ्यांनी मांडलेल्या दुकानातून विविध वस्तू खरेदी केल्या.
या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थ, स्टेशनरी, भाजीपाला, फळे, चहा, दूध अशा विविध वस्तूंची 100 ते 120 दुकाने थाटली होती.
विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमासोबतच व्यवहारिक ज्ञान प्राप्त व्हावी म्हणून प्रशालेने हा मेळावा आयोजित केला होता.
सर्वच मान्यवरांनी या मुलांचे खूप खूप कौतुक केले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी प्रशालेतील सर्वच कर्मचाऱ्यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती ठाणंबीर मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री मिसाळ सर यांनी केले.
स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.