स्टार माझा न्यूज परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने
परंडा, ता. १ (प्रतिनिधी) – परंडा शहरात श्री गणेश जयंतीनिमित्त विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. शहरातील एकमेव ट्रस्टी असलेल्या जय भवानी गणेश मंदिरात मोठ्या भक्तिभावाने गणेश जयंती उत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांसह, “रक्तदान सर्वश्रेष्ठ दान” या सामाजिक उपक्रमाअंतर्गत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

रक्तदान शिबिराला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शहरातील गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत रक्तदान शिबिराला प्रतिसाद दिला. एकूण ५७ भाविक भक्तांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. या शिबिराचा शुभारंभ व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश काशीद आणि महेबुब हन्नुरे यांच्या हस्ते करण्यात आला. जय भवानी गणेश मंडळाच्या वतीने रक्तदात्यांना पाण्याचे जार भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या शिबिरासाठी सह्याद्री ब्लड बँक, (उस्मानाबाद) धाराशिव यांनी रक्त संकलित केले.
परांडा येथे गणेश जयंतीचा भव्य उत्सव
गणेश जयंतीनिमित्त जय भवानी चौकात भव्य मंडप उभारण्यात आला होता. मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. महिला मंडळाच्या वतीने गणेश जन्माचा पाळणा बांधून मोठ्या भक्तिभावाने गणेशाचे स्वागत करण्यात आले होते.

दुपारी १२ वाजता गणेशाची महाआरती करण्यात आली. मंदिरासमोर आकर्षक रांगोळी रेखाटली होती, ज्यामुळे मंदिर परिसर भक्तिमय आणि सौंदर्यपूर्ण वातावरणाने नटला होता.
महाप्रसाद आणि विविध धार्मिक कार्यक्रम
उत्सवाच्या निमित्ताने शहर व परिसरातील भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांचा उत्सवातील सहभाग
या उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी आणि रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी जय भवानी गणेश मंडळाचे आण्णा लोकरे, आकाश काशीद, हणमंत हातोळकर, सनी काशीद, कुणाल जाधव, योगेश मस्के, पंकज नांगरे, विशाल काशीद, आदित्य नांगरे, वैभव मस्के, संतोष भालेकर, अतुल काशीद, आण्णा काटवटे, विनायक काटवटे, बाॅबी काशीद, प्रतीक मस्के, करण काशीद, सुजय जाधव, विशाल काटवटे, ओंकार काशीद यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मोलाची भूमिका बजावली.
श्री गणेश जयंतीच्या निमत्ताने भक्तिमय वातावरणात सामाजिक उपक्रमाचे आयोजन
जय भवानी गणेश मंदिरात पार पडलेल्या या उत्सवाने धार्मिकतेबरोबरच सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला. गणेश जयंतीनिमित्त केवळ धार्मिक कार्यक्रम न घेता रक्तदानासारख्या सामाजिक कार्याचा समावेश केल्याने उत्सव अधिकच अर्थपूर्ण ठरला.
स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.