परांडा-सोनारी रस्त्यावर एस.टी.बसचा भीषण अपघात.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने

परांडा प्रतिनिधी दिनांक 27जानेवारी रोजी सकाळी परांडा-सोनारी रस्त्यावर एस.टी. बस झाडावर आदळून भीषण अपघात झाला. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले असून, शालेय विद्यार्थ्यांचाही समावेश होता. घटनेची माहिती मिळताच परांडा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ.राहुल मोटे यांनी तत्काळ अपघातस्थळी भेट दिली  मदत्कर्याची माहिती घेतली.



मा.आ मोटेंची अपघातस्थळी धाव:
अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच राहुल मोटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी परिवहन विभागाचे धाराशिव जिल्हा विभागीय नियंत्रक श्री.भालेराव व परांडा आगार प्रमुख श्री. शिनगारे यावेळी उपस्थित होते. अपघातग्रस्त प्रवाशांना तत्काळ वैद्यकीय मदत मिळावी यासाठी मा.आ. राहुल मोटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.  

                                                                 मोटे यांची उपजिल्हा रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस.
अपघातठिकाणचा आढावा घेतल्यानंतर राहुल मोटे यांनी उपजिल्हा रुग्णालय परांडा येथे जाऊन जखमी प्रवाशांची भेट घेतली. जखमींची विचारपुस करून  डॉक्टरांशी चर्चा केली व जखमींना चांगले उपचार देण्याच्या सूचना दिल्या. जखमी प्रवाशांना लवकरात लवकर योग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी प्रशासनाला विशेष लक्ष देण्याचा आग्रह धरला.



या कठीण प्रसंगात मा.आ राहुल  मोटे यांनी घेतलेल्या तातडीच्या कृतीमुळे जखमीं प्रवाश्यांना आधार मिळाला. त्यांच्या तत्परतेमुळे आणि संवेदनशीलतेमुळे स्थानिकांनी त्यांचे कौतुक करूनआभार मानले.

हा अपघात गंभीर असून भविष्यात असे अपघात होऊ नयेत यासाठी संबंधित यंत्रणांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!