उडान फाउंडेशनचे महारक्तदान शिबिर यशस्वीरित्या संपन्न

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898

बार्शी प्रतिनिधी दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त बार्शीत उडान फाउंडेशनच्या वतीने यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृहात आयोजित भव्य महारक्तदान शिबिराला बार्शीकरांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे राज्यातील रुग्णालयांना आवश्यकतेनुसार रक्ताचा पुरवठा करणे आणि गरीब तसेच गरजू रुग्णांना मदत करणे हाच या मागचा आणि स्वार्थी हेतू होय. “रक्तदान हेच जीवनदान” या विचाराने प्रेरित होऊन उडान फाउंडेशनने हे शिबिर यशस्वीपणे आयोजित केले.

शिबिरातील रक्तदात्यांचा सहभाग आणि योगदान:
या शिबिरामध्ये एकूण 133 रक्तदात्यांनी सहभाग घेतला. प्रत्येक रक्तदात्यास प्रमाणपत्र आणि गुलाबाचे फूल देऊन उडान फाउंडेशनने कृतज्ञता व्यक्त केली. यामध्ये महिला आणि अपंग व्यक्तींनीही सहभाग नोंदवत “हम भी कुछ कम नहीं” हा संदेश दिला.

रक्तसंकलन:-
शिबिरात जमा झालेले रक्त भगवंत ब्लड बँक, बार्शी आणि महात्मा बसवेश्वर ब्लड सेंटर, सोलापूर यांच्या माध्यमातून संकलित करण्यात आले. या रक्तसाठ्याचा काही भाग गरीब व गरजू रुग्णांच्या उपचारांसाठी वापरण्यात येणार आहे असे उडान फाउंडेशन कडून सांगण्यात आले.

शिबिरासाठी विशेष मोलाचे सहकार्य:
शिबिराच्या यशस्वितेमध्ये आशपक काझी, अमर धस, विजय तोडकरी आणि अनिरुद्ध देशमाने यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले.

सदरील शिबिर यशस्वी होण्यासाठी उडान फाउंडेशनच्या सदस्यांनी पुढाकार घेतला:
सल्लागार शब्बीर वस्ताद, युन्नुस शेख, अध्यक्ष इरफान शेख, उपाध्यक्ष जफर शेख, सचिव जमील खान, कार्याध्यक्ष शकील मुलानी, खजिनदार शोयब काझी, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष वसीम पठाण, माजी अभियंता समशेर पठाण, तौसीफ बागवान, साजन शेख, मोहसीन पठाण, हाजी राजू शिकलकर, रॉनी सैय्यद, अमजद शेख, ज्येष्ठ समाजसेवक सलीम चाचा चौधरी, रियाज बागवान, सलमान बागवान, सादिक रेडियटर, अकील मुजावर, आणि अल्ताफ शेख या सर्व सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

उडान फाउंडेशनचे हे महारक्तदान शिबिर बार्शीतील समाजसेवेचा एक उत्कृष्ट आदर्श ठरले आहे. रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत, समाजाला प्रेरित करण्याचे कार्य फाउंडेशनने यशस्वीरित्या पूर्ण केले आहे पुढील काळात आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून हजारो तरुणांना प्रेरणा देणारे कार्य घडो.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!