डॉक्टरांवरील शिवीगाळ व मारहाणीच्या घटनेमुळे परंड्यात खळबळ.

Picture of starmazanews

starmazanews

डॉक्टरांना शिवीगाळ प्रकरण: डॉक्टर संघटनेचा निषेध, दोषींवर कारवाईची मागणी.
स्टार माझा न्यूज परंडा, प्रतिनिधी: गोरख देशमाने.

महिला कंपाउंडर व तिच्या नातेवाईकांकडून परंडा शहरातील डॉक्टर अर्जुन काळे यांना शिवीगाळ करत धमकी व पैशाची मागणी केल्याच्या घटनेवर परंडा तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या प्रकरणी तहसीलदार निलेश काकडे व पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

घटनेचा आढावा:
डॉ. अर्जुन काळे हे परंडा तालुक्यात गेल्या सहा वर्षांपासून वैद्यकीय सेवा देत आहेत. त्यांच्या दवाखान्यात चार वर्षांपासून कौशल्या मोहिते नावाची महिला कंपाउंडर म्हणून सहा हजार रुपयांच्या मानधनावर काम करत होती. ती महिला रुग्णांकडून स्वतःच्या फायद्यासाठी पैसे मागत असल्याच्या अनेक तक्रारी डॉक्टर काळे यांच्याकडे आल्या होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने डॉक्टरांनी तिला रुग्णांकडून पैसे मागू नका असे सांगितले होते.

तथापि, महिलेकडून पैशांची मागणी थांबली नाही. त्यामुळे डॉक्टरांनी तिला कामावरून काढून टाकले. या कारणावरून महिलेने राग धरून डॉक्टर काळे यांना आत्महत्येची धमकी दिली. तिच्या नातेवाईकांसह मेडिकल दुकानात येऊन शिवीगाळ, डोळ्यांमध्ये चटणी फेकणे, काठीने व दगडाने मारहाण करणे असे गंभीर प्रकार घडले. या घटनेबाबत ५ डिसेंबर रोजी डॉक्टरांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

परंतु, संबंधित महिलेने डॉक्टर अर्जुन काळे व त्यांच्या भावावर खोट्या तक्रारी दाखल केल्या आहेत. याशिवाय, तिच्या नातेवाईकांनी डॉक्टरांचे खोटे आरोप लावून समाजात बदनामी केली असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.



डॉक्टर संघटनेची भूमिका:
सदर महिलेने कामावरून काढल्याचा राग मनात ठेवून वारंवार डॉक्टर काळे व इतर डॉक्टरांकडे पैशांची मागणी केली आहे. डॉक्टरांवर झालेले हे गंभीर आरोप असह्य आहेत. या संदर्भात परंडा तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनने तहसीलदार व पोलीस निरीक्षकांकडे निवेदन देऊन दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

निवेदनावर डॉक्टर नितीन मोरे (अध्यक्ष), डॉक्टर अर्जुन काळे (सचिव), डॉक्टर जयश्री गोपने, डॉक्टर विकास करळे, डॉक्टर किरण विटकर, डॉक्टर प्रदीप राऊत, डॉक्टर अमोल मुसळे, डॉक्टर तुकाराम काळे, डॉक्टर अजित पवार, डॉक्टर सरफणे, डॉक्टर सचिन मोरे, डॉक्टर आनंद बालदोटा, डॉक्टर अमोल पवार, डॉक्टर आनंद मोरे, डॉक्टर नागेश जायभाय, डॉक्टर आशिष ठाकूर, डॉक्टर मंदार पंडित, डॉक्टर मयूर मुंडे, डॉक्टर चंद्रकांत शिंदे, डॉक्टर देवदत्त कुलकर्णी, डॉक्टर सय्यद, डॉक्टर इब्राहिम तुटके यांच्यासह इतर डॉक्टरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

डॉक्टरांचे आवाहन:
वैद्यकीय क्षेत्राला अशा घटनांमुळे बदनाम करण्यात येत आहे. डॉक्टरांवरील खोट्या आरोप व पैशांच्या मागणीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी डॉक्टर संघटनेने केली आहे.

सार्वजनिक हितासाठी प्रशासनाचे पाऊल महत्त्वाचे:
या प्रकरणाचा सर्वांगीण तपास करून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. प्रशासन व पोलीस विभाग यावर काय निर्णय घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!