ट्रायचा मोठा निर्णय: डेटा पॅकची सक्ती संपली, ग्राहकांना निवडीचा अधिकार.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898

ग्राहकांसाठी आनंदाची बातमी: आता स्वतंत्र व्हॉईस आणि एसएमएस प्लॅन्स उपलब्ध होणार!

देशातील कोट्यवधी मोबाइल युजर्ससाठी टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाकडून (TRAI) मोठा दिलासा मिळाला आहे. ट्रायने नवीन नियम लागू करताना कंपन्यांना व्हॉईस आणि एसएमएस पॅक वेगळे देण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे ग्राहकांना आता केवळ आवश्यक सेवांसाठी पैसे भरता येणार असून अनावश्यक डेटा पॅक खरेदी करण्याची सक्ती होणार नाही.

ग्राहकांना दिलासा
ट्रायच्या नव्या नियमांमुळे ग्रामीण भागातील ग्राहक, विशेषतः टू-जी सिम वापरणारे युजर्स, जिथे इंटरनेटचा वापर कमी आहे, त्यांना मोठा फायदा होणार आहे. आतापर्यंत कंपन्या ग्राहकांना कॉम्बो पॅकच्या माध्यमातून इंटरनेट, व्हॉईस आणि एसएमएस एकत्रित स्वरूपात विकत होत्या, ज्यामुळे डेटा न वापरणाऱ्या ग्राहकांनाही अनावश्यक पैसे खर्च करावे लागत होते.

नवीन नियम काय?
व्हॉईस आणि एसएमएससाठी स्वतंत्र एसटीव्ही अनिवार्य: कंपन्यांना आता स्वतंत्र व्हॉईस आणि एसएमएससाठी खास टॅरिफ व्हाउचर (Special Tariff Voucher) द्यावे लागणार आहे.
एसटीव्हीची वैधता वाढली: यापूर्वी एसटीव्हीची वैधता 90 दिवस होती. ती आता 365 दिवसांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
10 रुपयांचे टॉप-अप व्हाउचर अनिवार्य: कमी खर्चातील प्लॅन्स उपलब्ध करून देण्यासाठी कंपन्यांना 10 रुपयांचे व्हाउचर ठेवणे बंधनकारक आहे.
ग्राहकांच्या गरजांवर लक्ष
फीचर फोन वापरणारे, वृद्ध आणि ग्रामीण भागातील लोक मुख्यतः व्हॉईस आणि एसएमएस सेवा वापरतात. डेटा सेवा न वापरणाऱ्या ग्राहकांसाठी स्वतंत्र प्लॅन्स उपलब्ध झाल्यामुळे त्यांना कमी खर्चात सेवा घेता येणार आहे.

सरकारच्या डिजिटल मोहिमेला गती
ग्राहकांना निवडीचा पर्याय मिळाल्याने डेटा इनक्लूजनवरही परिणाम होणार नाही, असे ट्रायने स्पष्ट केले आहे. यामुळे सरकारची डिजिटल इंडिया मोहीम अधिक वेगाने पुढे जाईल.

नवीन निर्णयाचा फायदा
ग्राहकांना परवडणारे आणि आवश्यकतेनुसार पॅक निवडता येणार.
ग्रामीण भागातील आणि इंटरनेट न वापरणाऱ्या युजर्ससाठी मोठा दिलासा.
वृद्ध आणि फीचर फोन वापरणाऱ्यांना सहज सेवा उपलब्ध होणार.
ट्रायने सप्टेंबर ते नोव्हेंबर 2022 दरम्यान केलेल्या सर्वेक्षणानंतर हा निर्णय घेतला आहे. या बदलांमुळे ग्राहकांना अधिक चांगले पर्याय उपलब्ध होणार असून त्यांच्या निवडीचा अधिकारही वाढणार आहे.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!