स्टार माझा न्यूज परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
परंडा मतदार संघातील विकासासाठी सावंत साहेबांना मतदानाचा निर्धार
बार्शीजवळील परंडा मतदार संघातील राजपुरा मोमिन गल्लीतील युवकांनी एकत्र येऊन आगामी निवडणुकांमध्ये सावंत साहेबांना पाठिंबा देण्याचा निर्धार केला आहे. यावेळी आयोजित बैठकीत शिवसेना नेते समीर पठाण, सलमान ताबोळी, आणि अय्याज पठाण यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला.
युवकांनी सांगितले की, “परंडा मतदार संघाच्या ओळखीला मागील काही वर्षांपासून गती मिळाली नाही. परंतु, सावंत साहेबांनी कॅबिनेट मंत्री म्हणून काम करताना संपूर्ण राज्यभर विकासाची गंगा वाहून नेली आहे. तेच परंडा मतदार संघाचाही विकास करू शकतात. त्यांच्याच नेतृत्वाखाली मतदार संघाचे नाव उज्वल होईल.”
सावंत साहेबांनी मंत्रीपदाच्या माध्यमातून विविध विकासकामे केली असून, त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे मतदार संघाला नव्या दिशा मिळाल्याचा दावा युवकांनी केला. “आम्ही परंडा मतदार संघात खऱ्या अर्थाने अच्छे दिन आणण्यासाठी सावंत साहेबांवर विश्वास ठेवतो. त्यांच्या नेतृत्वाखालीच आम्हाला विकासाची खात्री आहे,” असे मत युवकांनी व्यक्त केले.
या बैठकीत समीर पठाण यांनीही सावंत साहेबांच्या कार्याची प्रशंसा करत, “परंडा मतदार संघाच्या प्रत्येक गावात आणि गल्लीबोळात विकासकामे पोहोचवण्याचे काम फक्त सावंत साहेबच करू शकतात. त्यांनी केलेले प्रकल्प आणि योजना हे याचे उत्तम उदाहरण आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत प्रत्येकाने त्यांना मोठ्या संख्येने मतदान करावे,” असे आवाहन केले.
या बैठकीला उपस्थित असलेल्या युवकांनी एकमुखाने सावंत साहेबांना मतदान करण्याचा निर्धार करत त्यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला. “परंडा मतदार संघाचा विकास आणि प्रगती हीच आमची प्राथमिकता असून सावंत साहेबांचे नेतृत्वच ते साध्य करू शकते,” असे युवकांनी सांगितले.
स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.