परंडा विधानसभा, काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम, बैठक घेत तटस्थ राहण्याचा निर्णय.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने

परंडा प्रतिनिधी   परंडा  विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना उ.बा.ठा. त्याच प्रमाणे राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार गट या दोन्ही पक्षांना उमेदवारी घोषित झाल्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले त्यामुळे आज दिनांक.27.10.2024 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस परंडा यांचे वतीने पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली त्यावेळी परंडा तालुक्यातील संपूर्ण पदाधिकाऱ्यांचे एक मुखाने असे ठरले की महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित होत नाही तोपर्यंत त्याचप्रमाणे पक्षाचा आदेश येईपर्यंत तटस्थ राहण्याची भूमिका घेण्याची आहे महाविकास आघाडीचा जो उमेदवार निश्चित होईल त्या उमेदवाराचे एक निष्ठेने काम करण्याचे ठरले आहे. सदरील बैठकीस तालुका अध्यक्ष हनुमंत वाघमोडे, शहराध्यक्ष रमेश परदेशी, ज्येष्ठ नेते दादासाहेब खरसडे, ज्येष्ठ नेते रणजीतसिंह पाटील, ज्येष्ठ नेते नुरोद्दीन चौधरी, श्रीकांत भालेराव, मधुकर पाटील, अजय खरसडे, नितीन गाढवे, रवींद्र सोनवणे, महावीर इतापे,अवधूत पाटील, संभाजी काळे, संदीप ठवरे, बाळासाहेब पाटील, शहानवाज पठाण,भगवान खैरे,शशिकांत खैरे, गणेश चव्हाण, आधी पदाधिकारी उपस्थित होते

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!