स्टार माझा न्यूज परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
भूम तालुक्यातील पखरूड येथे वंचित बहूजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष मा.प्रविण दादा रणबागूल यांच्या प्रयत्नातून बांधण्यात आलेल्या सिंगल फेज डीपीचा लोकार्पण सोहळा पखरूड येथे मा.प्रविण दादा रणबागूल यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी आलेल्या पाहुण्यांचे बॅंडच्या गजरात संपूर्ण गावात मिरवणूक काढण्यात आली. सर्वजण मिरवणुकीने कार्यक्रम स्थळी पोहोचले.
फित कापून डीपीचे उद्घाटन करण्यात आले. नंतर सर्व गाड्या फिरून त्यांनी विविध देवांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने पुष्पहार घालून प्रविण दादा रणबागूल यांचा सत्कार करण्यात आला.
ग्रामस्थांच्या वतीने मनोगते व्यक्त करण्यात आली. दादा सर्वसामान्य आणि गरिबांचे नेते आहेत. ह्यावेळी कुठल्याही भूलथापांना बळी न पडता सिलेंडर घ्या चिन्हासमोरी बटन न चुकता दाबा आणि दादांनाच निवडून द्या असे आवाहन करण्यात आले.
उपस्थितांना संबोधित करताना मा.प्रविण दादा रणबागूल म्हणाले की, बोअर होत्या पण लाईट नसल्याने अडचण होती. ग्रामस्थांनी त्यांची समस्या मांडली आणि मी ह्या ट्रान्सफॉर्मर चे काम केले. आपल्या सर्व मतदारांना गृहीत धरणाऱ्या प्रस्थापितांना त्याची जागा दाखवा.आपल्या जिवाभावाचा आपले म्हणणे ऐकणारा आपल्या अडचणीत मदत करणारा आपला हक्काचा माणूस निवडून द्या असे आवाहन उपस्थित प्रखरूड ग्रामस्थांना केले.
याप्रसंगी पखरूड ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.