स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
( कु . स्नेहल सुधाकर कोकाटे कु . रिया रमेश परदेशी कु . निशिगंधा देडगे कु . प्राजक्ता पोरवाल कु . मधु काशीद यांचा झाला सत्कार )
प्रतिनिधी परांडा दि . 15 सप्टेंबर 2024 येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परंडा या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी कु . स्नेहल सुधाकर कोकाटे कु .रिया रमेश परदेशी कु निशिगंधा देडगे कु मधू काशीद कु .प्राजक्ता पोरवाल या विद्यार्थिनींना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत महाविद्यालयामध्ये विविध विषयासाठी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली .प्रत्येकी प्रति महिना दहा हजार रुपये मानधन या विद्यार्थ्यांना मिळणार असून त्यांना प्रशिक्षक म्हणून महाविद्यालयामध्ये नियुक्त केले आहे त्यामुळे त्यांचा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा . एकनाथ शिंदे यांच्या हस्ते परंडा येथे आयोजित केलेल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत कार्यक्रमात सत्कार करण्यात आला . याप्रसंगी धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आरोग्य मंत्री तानाजी सावंत आमदार सुजितसिंह ठाकूर तसेचधाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे महाराष्ट्र राज्यातील अनेक प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .सदर विद्यार्थ्यांनामुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्कार केल्यामुळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर अध्यक्ष सुनील शिंदे उपप्राचार्य डॉ महेशकुमार माने स्टाफ सेक्रेटरी डॉ शहाजी चंदनशिवे डॉ प्रकाश सरवदे डॉ संतोष काळे डॉ अक्षय घुमरे प्रशासकीय अधिकारी भाऊसाहेब दिवाने कार्यालयीन अधीक्षक श्रीमती पद्मा शिंदे व महेश पडवळ यांनी अभिनंदन व कौतुक केले .सदर विद्यार्थ्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्कार केल्यामुळे शहरात व तालुक्यात त्यांचे कौतुक होत आहे .
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.