स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
परंडा (प्रतिनिधी ) परंडा तालुक्यातील दिव्यांग बांधवांना दिव्यांग प्रमाणपत्र मिळावे. दिव्यांग प्रमाणपत्र पासून वंचित राहू नये यासाठी दिव्यांग उद्योग समूहाच्या पाठपुराव्यातून दिव्यांग तपासणीचे आयोजन जिल्हा शैल्य चिकित्सक अधिकारी धाराशिव, उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय परांडा यांच्या संयुक्त विद्यमानाने 6 सप्टेंबर 2024 रोजी उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय परांडा येथे दिव्यांग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये अस्तिव्यंग दिव्यांग मनोरुग्न , अंध, अशा 42 दिव्यांग व्यक्तीची तपासणी करण्यात आली ही तपासणी करण्यासाठी अस्तिव्यंग तज्ञ डॉ.कवढे मनोरुग्ण विभागाचे डॉ. शिंदे, अंध विभागाचे डॉ. महेश पाटील या तज्ञांच्या टीमने कामकाज पाहिले यांना सहकार्य करणारे उपजिल्हा रुग्णालय येथील सर्व कर्मचारी उपस्थित होते. तसेच हे काम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी डॉ. विश्वेश कुलकर्णी व सहकारी यांनी सहकार्य केले यावेळी दिव्यांग उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष तथा जिल्हाप्रमुख तानाजी घोडके , प्रकाश काशीद , मुजीब काझी फारुख शेख शहर प्रमुख गोरख देशमाने , रावसाहेब खरसडे शिक्षण विभागातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी काम पाहणारे कर्मचारी, विशेष तज्ञ-आत्तार सर,जाधव मॅडम विशेष शिक्षक-हाजगुडे सर, कवडे सर, बेडके मॅडम ,गोरे मॅडम. कर्मचारी व तालुक्यातील दिव्यांग बांधव उपस्थित होते.
स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898
![](https://i0.wp.com/starmazanews.com/wp-content/uploads/2024/09/img-20240906-wa01665034906534018200450.jpg?resize=800%2C512&ssl=1)
![starmazanews](https://secure.gravatar.com/avatar/4fda7f8e27869db8a392615e0d2c6001?s=96&r=g&d=https://starmazanews.com/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.