स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
परंडा प्रतिनिधी भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस कल्याणसागर को ओप्रेटोव्ह बँकेचे संस्थापक अध्यक्ष
मा. आ. सुजितसिंह ठाकूर यांना विधानपरिषदेतील “उत्कृष्ट भाषण” पुरस्कार!
राष्ट्रपतींच्या हस्ते मुंबईत पुरस्कार वितरण होणार…
परंडा:- भारतीय जनता पार्टीचे विधानपरिषदेचे माजी आमदार श्री. सुजितसिंह ठाकूर यांची राष्ट्रकुल संसदीय मंडळा मार्फत विधानपरिषदेतील भाषणाबद्दल “उत्कृष्ट भाषण” या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
हा पुरस्कार वितरण सोहळा भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते मंगळवार दि. ३ सप्टेंबर २०२४ रोजी दु. ३.३० वाजता मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे संपन्न होणार आहे. मा. आ. ठाकूर यांना विधानमंडळ कार्यालयातून दूरध्वनी व ईमेल करून या पुरस्काराबद्दल कळविण्यात आले आहे.
या समारंभास महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु तसेच महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार, संसदीय कार्य मंत्री श्री. चंद्रकांत पाटील, विधानपरिषद विरोधी पक्ष नेते श्री. अंबादास दानवे, विधानसभा विरोधी पक्ष नेते श्री. विजय वडेट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून यावेळी विधानसभा अध्यक्ष श्री. राहुल नार्वेकर, विधानपरिषद उपसभापती डॅा. नीलमताई गो-हे व विधानसभा उपसभापती श्री. नरहरी झिरवळ हे उपस्थित राहणार आहेत.
मा. आ. सुजितसिंह ठाकूर यांना सन २०१८-१९ करिता महाराष्ट्र विधानपरिषद “उत्कृष्ट भाषण” पुरस्कार देण्यात येत असून ठाकूर यांनी विधीमंडळात मराठवाडा आणि धाराशिव जिल्ह्यात सततचा पडणारा दुष्काळ, पाणी टंचाई, मराठवाड्याचे हक्काचे २३.६६ टीएमसी कृष्णा खो-यातील पाणी, शेतकरी कर्ज माफी, जलयुक्त शिवार, शेतीपंपाचा वीज प्रश्न,मराठवाड्याचे मागासलेपण, दरडोई कमी असलेले उत्पन्न, धाराशिव येथील वैद्यकीय महाविद्यालय आदी राज्यातील जनतेच्या जिव्हाळ्याचे अनेक विषय प्रभावीपणे सभागृहात मांडले होते.
राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्यावतीने मा. आ. सुजितसिंह ठाकूर यांना “उत्कृष्ट भाषण” हा पुरस्कार मिळाल्याबद्दल ठाकूर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
स्टार माझा न्यूज संपादक -रियाज पठाण 9405749898/9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.