परंड्यात खा.ओमराजेंच्या जनता दरबारास, मोठा प्रतिसाद,अनेक समस्यांचे निवारण

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.


दिनांक १२ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता, परंडा पंचायत समिती सभागृह येथे धाराशिव खासदार ओमप्रकाश राजेंनिंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबार आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात मा. आमदार ज्ञानेश्वर तात्या पाटील, मा. आमदार राहूल भैय्या मोटे, जिल्हाप्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील, महिला आघाडी जिल्हाप्रमुख जिन्नत सय्यद, तालुका प्रमुख मेघराज पाटील, शहरप्रमुख रईस मुजावर, मा. नगराध्यक्ष सुभाष शिंदे, सभापती जयकुमार जैन, मा. सभापती शंकर इताप, मा. नगरसेवक डॉ. अब्बास मुजावर, मा. नगरसेवक संजय कदम, राष्ट्रवादी अल्पसंख्याक (SP) प्रदेश सचिव नसीर शहाबर्फीवाले, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष राहूल बनसोडे, राष्ट्रवादी (SP) शहरध्यक्ष श्रीहरी नाईकवाडी, सरपंच, नगरसेवक, शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
या जनता दरबारात नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या आणि अनेक समस्यांचे तातडीने निवारण करण्याचे आश्वासन खासदारांनी दिले. या कार्यक्रमामुळे परंड्यातील नागरिकांमध्ये खासदारांबद्दल आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!