www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
बार्शी प्रतिनिधि दिनांक 11ऑगस्ट. मराठा आरक्षणाचे अभ्यासक ॲड गणेश हांडे यांनी घेतली शरद पवार यांची भेट. यावेळी त्यांना आरक्षणातील बारकावे व सद्या राज्यात सुरु असलेल्या आंदोलन या विषयी चर्चा केली त्या दरम्यान शरद पवार यांनी तामिनाडूमधील उदाहरण दिले त्यावेळेस हांडे यांनी ते शेद्दुल 9 मध्ये कायदा टाकलेला आहे त्यामुळे ते कोणत्याही कोर्टात रिविव्ह करता येत नाही तसेच त्यावेळची परिस्थिती व आत्ताची परस्थिती फार वेगळी आहे असे सांगितले. तसेच 1994 साली वाडवलेले 16%आरक्षण, ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण, सुप्रीम कोर्टातील इंद्रा सहानी विरुद्ध भारत सरकार या केसबद्दलही सर्व बारकावे सांगितले, राज्यात ओबीसी संख्या 36% आहे परंतु त्यांना आरक्षण 32% आहे असे सांगीतले,सगेसोयरे या बाबत ही चर्चा केली. शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांची सगेसोयरे ची मागणी पूर्ण केली पाहिजे त्याला अमच्या पक्षाचा पाठींबा आहे असे सांगितले. यावेळी विश्वासभाऊ बारबोले यांनीही मराठा समाजाची मागणी कशी योग्य आहे व ती पूर्ण झाली पाहिजे असे मा शरद पवार साहेबांना सांगितले त्यावर पावर साहेब यांनी सकारात्मकता दर्शवली पाठिंबा दिला. व मी पुढील तीन दिवस मुंबईत आहे सरकारने बोलावलेल्या मिटींगला मी हजर राहील माझ्या पक्षाची ही भूमिका स्पष्ट सांगेल तसेच जरांगे पाटील यांनाही त्या मिटींगला सरकारने बोलवावे असे मत त्यांनी व्यक्त केले.त्यांना सविस्तर मागणीचे निवेदन ही दीले, यावेळी कृष्णराज बारबोले, विश्वास भाऊ बारबोले,शुभम चव्हाण,निलेश शिंदे आदी उपस्थित होते.
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.