लायन्स क्लब ऑफ बार्शी टाउन बार्शी शहरात दहा ऑक्सिजन पार्कची निर्मिती करणार.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज  पठाण 9405749898 / 9408749898
* 5000 वृक्षारोपण चळवळीचा भव्य शुभारंभ=
* बार्शी( प्रतिनिधी)
* लायन्स इंटरनस्टारॅशनल प्रांत 3234 विभाग 1 उपविभाग 4 लायन्स क्लब बार्शी टाऊन यांच्या वतीने बार्शी शहरात रविवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता कुर्डूवाडी रोड ढगे मळा येथे 5000 वृक्षारोपण चळवळीचा भव्य शुभारंभ होणार असून शहराच्या विविध भागात दहा ऑक्सिजन पार्क निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती लायन्स क्लब ऑफ बार्शी टाउन चेअध्यक्ष महावीर कदम यांनी दिली आहे. यावेळी क्लबचे सचिव हेमंत जमदाडे, खजिनदार किरण आवटे, ऑक्सीजन पार्क क्रमांक एकचे  प्रकल्प प्रमुख वासुदेव  ढगे, अमित कटारिया, डॉक्टर सागर हजगुडे आदी उपस्थित होते.
यावेळी कदम म्हणाले,” आपला देश आणि जगासमोर वाढते उष्णतामान हे सर्वात गंभीर. संकट आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल कायम राहण्यासाठी व पर्जन्यमानासाठी वनीकरण अत्यावश्यक आहे त्यामुळे आम्ही लायन्स क्लब ऑफ बार्शी टाऊनच्या माध्यमातून या चळवळीला शहराच्या कासारवाडी रोड, उपळाई रोड, अलिपूर रोड, रेल्वे स्टेशन रोड, जामगांव रोड, आगळगाव रोड,  धसपिंपळगाव रोड, परांडा रोड, कुर्डुवाडी रोड, इत्यादी भागात वृक्षारोपण करुन पाठबळ देणार आहोत सामाजिक वनीकरणांमध्ये बार्शी शहरात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या मॉर्निंग सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष व माजी नगरसेवक विजय नाना राऊत यांच्या हस्ते शुभारंभ करत आहोत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आर के क्लबचे अध्यक्ष गौतम कांकरिया, डॉक्टर मुकुंद तांबारे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या रोपण केलेल्या वृक्षांची आगामी काळात योग्य निगराणी करून त्यांचे संवर्धन करणार आहोत. तसेच या ऑक्सिजन पार्कच्या माध्यमातून शहर हिरवेगार मनोहारी दिसावे अशी आमची इच्छा आहे. तरी या वनीकरण चळवळीच्या भव्य शुभारंभास सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन कदम यांनी केले आहे.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!