स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
परंडा तालुक्यातील मौजे कात्राबाद
जिल्हा परिषद शाळा कात्राबाद येथे
शैक्षणिक साहित्य वाटप करून वाढदिवस साजरा
दिनांक 5ऑगस्ट 2024 वार सोमवार रोजी जि प प्राथमिक शाळा कात्राबाद येथे शाळेचे मुख्याध्यापक
शिवश्री रविंद्र माधवराव कापसे
( संचालक धाराशिव जिल्हा शिक्षक सहकारी पतसंस्था तथा जिल्हा उपाध्यक्ष शिक्षक संघ धाराशिव )
यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांना वही, पेन, पेन्सिल खोडरबर,पट्टी, चित्रकला वही आणि रंगखडू तसेच खाऊ वाटप करण्यात आला.

यावेळी शाळेचे सहशिक्षक दीपक मिरकले सर यांनी शाळेच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या
वाढदिवस एक शैक्षणिक चळवळ या उपक्रमाची माहिती सांगितली.या उपक्रमांतर्गत शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य तसेच शिक्षण प्रेमी नागरिक आपला वाढदिवस शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करून करतात.वाढदिवसाच्या निमित्ताने मिळालेले शैक्षणिक साहित्य विध्यार्थ्यांना वर्षभर पुरविले जाते.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचे पालकही आपल्या मुलांचा वाढदिवस शैक्षणिक साहित्य वाटप करून करतात असे सांगण्यात आले.
यावेळी गावातील तरुणांनी आणि शिक्षणप्रेमी नागरिकांनी आपले वाढदिवस अनावश्यक खर्च टाळून शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करून करावेत असे आवाहन शालचे मुख्याध्यापक शिवश्री रविंद्र कापसे यांनी आपल्या मनोगतातून केले.
यावेळी सहशिक्षक मिरकले सर यांनीही आपल्या मनोगतातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व शाळेच्या या उपक्रमाबद्दल कौतुक केले.
या कार्यक्रमासाठी विलास गरड,परमेश्वर बोराडे, सुलभा गरड,मुख्याध्यापक रविंद्र कापसे सर,सहशिक्षक दीपक मिरकले सर,विद्यार्थी,पालक उपस्थित होते.
स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898