कार्यालयीन अधीक्षक भाऊसाहेब दिवाने यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम संपन्नसेवानिवृत्तीनंतर भाऊसाहेब दिवाने यांना प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्ती
स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने // शहाजी चंदनशिवे
परांडा दि.31 जुलै 2024 प्रामाणिक काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या पाठीशी संस्था उभी असेल अशी प्रतिपादन श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर यांनी शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयाचे कार्यालय अधीक्षक भाऊसाहेब दिवाने यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संजय निंबाळकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव उपस्थित होते तर व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ महेशकुमार माने कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा किरण देशमुख सत्कारमूर्ती भाऊसाहेब दिवाने सौ दिवाने सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे श्री खामकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक डॉ शहाजी चंदनशिवे यांनी केले. याप्रसंगी शिक्षकेतर कर्मचारी महेश पडवळ कनिष्ठ विभागाचे प्रा तानाजी फरतडे प्रा उत्तम कोकाटे प्रा दीपक हुके प्रा विजय जाधव प्रा किरण देशमुख व वरिष्ठ विभागातून प्राध्यापक डॉ शहाजी चंदनशिवे यांनी आपली मनोगत व्यक्त केली.
पुढे बोलताना संजय निंबाळकर म्हणाले की भाऊसाहेब दिवाने हे महाविद्यालय स्थापनेपासून अविरतपणे 37 वर्ष सेवा करत होते ते वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत परंतु त्यांनी केलेल्या प्रामाणिक कामामुळे त्यांची प्रशासकीय अधिकारी म्हणून संस्था स्तरावरती नियुक्ती करण्यात येत आहे. तसे नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार केला .याप्रसंगी त्यांनी सांगितले की प्रत्येक कर्मचाऱ्यांनी प्रामाणिक पणे सेवा केल्यास संस्था सतत त्यांच्या पाठीशी असेल. विद्यार्थ्यांचे हित जोपासत संस्थेचे ही जोपासत प्रत्येक कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी पार पडली पाहिजे.
यावेळी रसायनशास्त्र विभागाचे प्रा अमर गोरे पाटील यांनी पदव्युत्तर विभागात तीन वर्ष प्रवेश प्रक्रिया प्रामाणिकपणे पार पडल्याने त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . यावेळी भाऊसाहेब दिवाने यांचा शाल श्रीफळ व भर पेरावा देऊन संस्थेच्या वतीने व महाविद्यालयाच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना भाऊसाहेब दिवाने म्हणाले की संस्थेने माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे त्या विश्वासास तडा न जाता मी प्रामाणिकपणे प्रशासकीय अधिकारी म्हणून सेवा करेन.तसेच महाविद्यालयातील वाणिज्य विभाग अंतर्गत कौशल्य विकास प्रयोगशाळा व प्राणीशास्त्र पदव्युत्तर विभागा च्या प्रयोगशाळेचे उद्घाटन ही करण्यात आले.
याप्रसंगी प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ अतुल हुंबे डॉ शहाजी चंदनशिवे प्राध्यापिका तबबसूम शेख तर वाणिज्य विभागाचे प्राध्यापक डॉ संभाजी गाते डॉ संतोष काळे प्रा शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ कृष्णा परभने अजित क्षीरसागर उपस्थित होते.याप्रसंगी महाविद्यालयातील अनेक कर्मचार्यांनी भाऊसाहेब दीवाने यांचा सत्कार केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. शेवटी कार्यक्रमाचे आभार डॉ सचिन चव्हाण यांनी मानले.
स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.