स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
परंडा,ता.२ (प्रतिनिधी ) युनेस्कोच्या ४६व्या जागतिक वारसा समितीच्या चर्चासत्रांमध्ये परंडा येथील आंतरराष्ट्रीय वारसा व परिषदांचे सदस्य अजय माळी तीन सञात आॕनलाईन सहभागी झाले होते.
भारत मंडपम नवी दिल्ली येथे ता. २१ जुलै ते ३१ जुलै २०२४ दरम्यान ४६ वी जागतिक वारसा समितीची बैठक पार पडली. जागतिक वारसा समितीची बैठक वर्षातून एकदा होते. १९७२ मधील बैठकीत भारत सामिल झाल्यानंतर भारतात प्रथमच भारताच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यक्रमाचे उदघाटन केले. याप्रसंगी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर, संस्कृती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, युनेस्कोच्या संचालिका श्रीमती आंद्रे अझेले यांच्यासह १५० देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जागतिक वारसा समितीच्या बैठकीस आंतरराष्ट्रीय वारसा व परिषदेचे सदस्य परंडा येथिल अजय माळी यांना तीन सत्रांचे निमंत्रण असल्याने ते ऑनलाईन सहभागी होते.
४६ वी जागतिक वारसा समितीची बैठक जागतिक वारसा समितीचे अध्यक्ष विशाल शर्मा यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. युनेस्को वारसा स्थळांच्या वार्षिक प्रस्तावांवर चर्चा होवुन निकषात बसणा-या वारसास्थळांना जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली जाते. या बैठकीमध्ये नविन २५ स्थळांना जागतिक वारसास्थळ म्हणून मान्यता देण्यात आली.ऐतिहासिक
परंडा किल्ला जागतिक वारसास्थळ होण्यासाठी अजय माळी हे दस्तऐवजीकरण करत आहेत. यासाठी त्यांनी युनेस्को, आंतरराष्ट्रीय वारसा समितीकडून शास्त्रशुध्द प्रशिक्षण घेतलेले आहे. एखाद्या स्थळाचा जागतिक वारसास्थळ म्हणून मान्यता मिळाल्यास त्या जिल्हयासह राज्याचाही आर्थिक विकास होऊन देशाच्या अर्थव्यवस्थेस चालना मिळते.श्री माळी यांनी परंडा भुईकोट किल्ल्यावर संशोधनात्मक फोटोग्राफीसह पुस्तक लिहिले आहे.
– प्रतिक्रीया चौकटीसाठी – युनेस्कोच्या ४६ व्या बैठकीत आसाममधील एक स्थळ “मोईदाम – अहोम राजवंशाची पर्वतावरील दफण प्रणाली” यास जागतिक वारसास्थळ मान्यता मिळाली. यामुळे जागतिक वारसास्थळांची संख्या १२२३ झाली तर भारतातील जागतिक वारसास्थळे ४३ झाली आहेत. धाराशिव जिल्हयातही जागतिक वारसास्थळ म्हणून दर्जा मिळू शकणारी – तेर, परंडा किल्ला, धाराशिव लेणी, नळदूर्ग किल्ला ही स्थळे आहेत. युनेस्कोच्या संस्कृती २०३० मधून सन २०३० पर्यंत संस्कृतीच्या माध्यमातून विकास उददीष्ट साध्य करण्यासाठी सामुदायिक प्रयत्न करून यासाठी मोठी चळवळ उभी केल्यास हे पूर्ण होऊ शकेल. -अजय माळी – सदस्य आतंरराष्ट्रीय वारसा स्थळे व परिषद !
स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898


Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.