स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
परंडा दिनांक २७ : – राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत शुक्रवारी परांडा तालुक्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान पालकमंत्री तानाजीराव सावंत यांच्या हस्ते तालुक्यातील विविध ठिकाणी विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले.
पालकमंत्री डॉ सावंत यांनी भूम परंडा वाशी मतदारसंघाच्या विकास कामासाठी हजारो कोटीचा निधी शासन दरबारी मंजूर केला आहे. या निधीच्या माध्यमातून परंडा मतदारसंघात विविध विकासकामांना सुरुवात झाली असून काही कामे पूर्णत्वाकडे आली आहेत. शुक्रवारी पालकमंत्री परांडा तालुक्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी डॉ.सावंत यांच्या दौऱ्याची सुरुवात होमपीच असलेल्या मुगाव येथून झाली. या ठिकाणी तानाजीराव सावंत साहेब यांच्या हस्ते मुगाव येथील विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर डोंजा येथून देऊळगावकडे जाणाऱ्या ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. गेल्या अनेक वर्षापासून गोसावीवाडी ते आलेश्वर हा रस्ता व्हावा अशी मागणी ग्रामस्थ करत होते. मात्र अनेक वर्षापासून खितपत पडलेला रस्त्याचा प्रश्न पालकमंत्री डॉ.सावंत यांनी तातडीने सोडवला. गोसावीवाडी आलेश्वर ५ किलोमीटर रस्त्याच्या कामाचा शुभारंभ डॉ सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. या रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला सावंत यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सुरुवात झाली. यावेळी गोसावीवाडी आलेश्वर येथील ग्रामस्थांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करत शुभारंभ कार्यक्रम स्थळी पालकमंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांचा जंगी सत्कार केला. तांदुळवाडी या ठिकाणी पालकमंत्री सावंत यांच्या हस्ते जन सुविधा योजनेअंतर्गत सभागृहासह नव्याने उभारण्यात आलेल्या पुलाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी सावंत यांनी तांदुळवाडी येथील ग्रामस्थांशी संवाद साधला. सायंकाळी वाटेफळ, हिंगणगाव खुर्द येथे गाव भेट दिली. सावंत यांच्या हस्ते जगदाळवाडी येथील नव्याने उभारण्यात आलेल्या पुलाचे लोकार्पण करण्यात आले. रात्री आठच्या सुमारास फटाक्यांच्या आतिषबाजीत इनगोदा येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सावंत यांनी ग्रामस्थांशी विविध विषयावर चर्चा केली. विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या विकास कामाच्या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता अण्णा साळुंके, सावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र घोगरे सर, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख गौतम लटके सर, ॲड सुभाष मोरे, शिवसेना तालुका संघटक जयदेव गोफणे, उद्योजक काकासाहेब साळुंके, पंचायत समितीचे माजी सभापती सतीश दैन, प्रशांत खरसडे आदी उपस्थित होते. ठीक ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या विकासकामांच्या कार्यक्रमाला ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती
स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.