विशाळगड, व गजापुर येथे  मुस्लिम समाजावर अत्याचार करणाऱ्या समाजकंटकावर कठोर कार्यवाही करण्यात यावी –
मौलाना आझाद विचार मंच.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

सोलापूर दि.19/7/2024
दि.१४ जुलै २०२४ रोजी कोल्हापूर येथील विशाळगड, व गजापुर येथे झालेल्या मुस्लिम समाजबांधव, स्त्रियांवर अत्याचार तथा त्यांचे धार्मिक स्थळाचे तोडफोड तथा नुकसान केल्याप्रकरणी गुन्हेगारांविरुद्ध योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी यासाठी मा.जिल्हाधिकारी साहेब, सोलापूर.यांना निवेदन देण्यात आले.
दि.१४ जुलै २०२४ रोजी काही समाजकंटकांनी पध्दतशीर व नियोजनबध्दपणे कोल्हापुर येथील विशाळगड व गजापुर या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थळांवर अतिक्रमण करुन धार्मिक स्थळाचे तोडफोड, नासधूस करुन मुस्लिम बांधव तथा स्त्रियांवर अन्याय, अत्याचार, मारहाण, अल्पसंख्यांक मुस्लिम समाजातील घरांवर दगडफेक, प्रार्थनास्थळावर दगडफेक, आई-बहीण व लहान मुलांवर कुर पध्दतीने मारहाण व अत्याचार करणेत आले जे पुरोगामी कोल्हापूरला अशोभनीय आहे.



सदर समाजकंटकांचे नेतृत्व करणारे काही व्यक्ति तसेच दंगलचे सुत्रधार यांनी प्लॅनिंग करून सद पुरविली गेली. जमावबंदी आदेश असताना सदर मोर्चा निघाला कसा? कोणाच्या परवानगीने मोर्चा काढण्यात आला, मोर्चाचे सुत्रधार कोण होते, मोर्चा काढण्याचे मुळ कारण काय होते व मोर्चा काढण्याचे कारण बरोबर असल्यास त्यावेळी मोर्चाला हिंसक रुप का आले. आणि सदरच्या हिंसाचारामध्ये फक्त मुस्लिम बांधव, स्त्रीया, लहान मुले-मुली व त्यांच्या धार्मिक स्थळाची तोडफोड का करण्यात आले व कोणाच्या आदेशाने करण्यात आले याचा खुलासा अत्यंत गरजेचे आहे. विशालगड व गजापुर येथे अतिक्रमण काढणे संदर्भात मोर्चेचे नियोजन केले होते.

त्यांच्याकडून दर्यावर हल्ला झाला. गजापूरमध्ये अतिक्रमणाचा कोणताही विषय नसताना मुस्लिम समाजावर अत्याचार करणेत आले. पोलीसांना मारहाण करुन पत्रकारांना धमकावणे अशाप्रकारे निंदनीय घटना घडले.

सदर घटनेमुळे कोल्हापूरात जातीय तणाव झाला व कायदा व सुव्यवस्थेस तडा लावण्याऱ्या तसेच सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तिवर योग्य ती कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात यावे हि नम्र विनंती आहे. विशाळगडवर जाणेकरिता एकच रस्ता आहे. सदर रस्त्यावर जाणेकरिता पोलीसांनी हत्यारसह समाजकंटकांना सोडणेत आले याला सर्वस्व जबाबदार पोलीस प्रशासन आहे. अतिक्रमण हिंदू मुस्लिमांचे असताना सदर ठिकाणी फक्त मुस्लिम समाजवर अत्याचार करणेत आले. गजापूर मुसलमानवाडी या ठीकाणी पोलीसांनी सुरक्षा दिली नाही व फक्त बघ्याची भुमिका घेतली यामुळे पोलीस प्रशासन पुर्णपणे जबाबदार आहे. तरी पोलीस अधिक्षक, कोल्हापूर यांची ताबडतोब बदली करणेत यावी अशी समस्त मुस्लिम समाज कोल्हापूर यांच्या वतीने विनंती करण्यात आली आहे.

संपुर्ण देशामध्ये राष्ट्रीय एकात्मता खंडित व राज्यात लोकशाही संपुष्टात येत असल्याचे दिसून येत आहे. याचे कारण असे की, निरनिराळ्या शहरांचे नांवे बदलणे, मुस्लिम लोकांवर होत असलेले अन्याय व अत्याचार, आणि नुकतेच घडलेले कोल्हापूर सारख्या सुंदर जिल्ह्यात जातीय दंगली घडविण्याचे हा प्रकार वारंवार होत आहेत तरी अशा समाजकंटकावर कठोर शासन कार्यवाही व्हावे अशी विनंती आहे अन्यथा मुस्लिम समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन व विराट मोर्चा काढू असे आपणास कळविणेत येत आहे तसेच अतिक्रमण विषयी जोपर्यंत कोर्टाचे निर्णय येत नाहीत, आणि सदर घटनेचे सुत्रधार व तोडफोड करणारे तथा अन्याय अत्याचार करुन मुस्लिम लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत जैसे थे परिस्थिती ठेवावी अशी समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने आग्रहाची मागणी आहे.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!