स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
परंडा दिनांक 20 कोल्हापूर येथील विशालगड परिसरातील मुस्लिम समाजावर हल्ला करणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करा.
कोल्हापुर येथील विशालगड च्या पायथ्याशी असणाऱ्या छोट्या वस्ती व गाजापुर गावात गरीब मुस्लिम कुटुंबावर व धार्मिक स्थळावर जातीयवादी संघटनाच्या कार्यकर्त्यांनी जो भ्याड हल्ला केला आहे त्याचा निषेध करून हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सकल मुस्लिम समाज व एम आय एम पक्षाच्या वतीने 19जुलै रोजी तहसील कार्यालय परंडा यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात येणार आहे
विशालगड येथे १४ जुलै रोजी गडावरील अतिक्रमण उठवण्याच्या कारणावरुन गावात जातीयवादी संघटनेच्या दहशतवादी गटाच्या लोकांनी एकत्र येऊन तेथील गरीब कुटूंबातील मुस्लिम समाजाच्या लोकांवर भ्याड हल्ला केला. तसेच दुकाने, घरे, चार चाकी व दुचाकी वाहने यांची जाळपोळ केली. लहान लेकरं महिलांना मारहाण केली. या घटनेचा आम्ही तिव्र निषेध करीत आहोत. या बाबीची आपण गांभिर्याने दखल घ्यावी, जेणेकरुन भविष्यात समाजामध्ये अशाप्रकारे हल्ला करणाऱ्या वर शासनाने निर्बंध टाकावे व कठोर कारवाई करावी अशा प्रकारचा निवेदन देण्यासाठी आजदिनांक 19,7,2024, परंडा तहसील येथे सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने तहसिलदार यांना निवेदन दिले
स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.