पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांचा मनाचा मोठेपणा मुकुंद तमाचे यांच्या मुलांच्या शिक्षण व लग्नाची घेतली जबाबदारी.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.

महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय प्रा डॉ तानाजीराव सावंत साहेब हे दिनांक 13/7/2024रोजी भैरवनाथ शुगर कारखाना येथे आले असता रा मात्रेवाडी ता भुम येथील मोलमजुरी करून आपली उपजीविका करणारे श्री मुकुंद अच्युत तमाचे -सुतार-याचे ब्लड कॅन्सर ने निधन झाले आणि घरावर दुःखाचा डोंगर कोसळला त्यांना तीन मुली व एक मुलगा असे चार अपत्ये याचं शिक्षण व पोट कसं भागवायच हा बिकट प्रश्न त्यांच्या पत्नी शामल मुकुंद अच्युत यांना पडला आणि त्यांच्या मनात एकच विचार आला की आम्हाला या भयंकर प्रस्थीतीत आदरणीय सावंत साहेब हेच आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील आणि ते भैरवनाथ शुगर कारखाना सोनारी येथे आले असता सर्व हकीकत सांगितली आणि तात्काळ लगेचच आदरणीय सावंत साहेब यांनी शामल   मुकुंद अच्युत यांना धीर दिला व कायम तुमचा भाऊ तूमच्या पाठीशी उभा राहिल  व 1-कुमारी जान्हवी मुकुंद अच्युत वय वर्षे 16 इ 10 वी–2– कुमारी तान्ह्वी मुकुंद अच्युत वय वर्षे 14 इयत्ता 8वी –3–माणशी मुकुंद अच्युत वय वर्षे 11इयत्ता 5वी–व कु क्रुष्णा मुकुंद अच्युत वय वर्षे 8 इयत्ता 2 री या सर्व मुलांची शिक्षणाची लग्नाची व नोकरीची सर्व जिम्मेदारी मी आजपासुन घेतली एक भाऊ म्हणून मी माझी जबाबदारी संपूर्णपणे पार पाडेल म्हणून शामल मुकुंद अच्युत व त्यांच्या चार मुलांचे पालकत्व स्वीकारले सावंत साहेब तुम्ही आमच्या साठी धाऊन आले खरे पांडुरंग आहेत आमच्यासाठी देव आहेत अशा भावुक होऊन शामल मुकुंद अच्युत व त्यांच्या चार मुलांनी साहेबांचे मनापासून आभार मानले

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!