स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
ता.१३ परंडा ऐतिहासिक भुईकोट किल्ला येथे वीररत्न शिवा काशीद यांचा स्मृतीदिन,बलिदान दिनानिमित्त अभिवादन करताना शिवशाहीर शरद नवले,मेजर महावीर तनपुरे, प्रकाश काशीद, मनोज चिंतामणी आदि! मान्यवर यावेळी उपस्थित होते.
स्वराज्याच्या संरक्षणासाठी आपल्या बलिदानाची आहुती देणारे शिवाजी महाराजांचे विश्वासु मावळे वीर शिवा काशीद हे इतिहासात कायम अजरामर झाले.जन्माला शिवाजी काशीद म्हणुन जन्मले असले तरी शेवटच्या क्षणी शिवाजी महाराजांच्या नावाने वीरमरण पत्करले हे लाखमोलाचे आहे.असे मत प्रसिध्द शिवव्याख्याते शरद नवले यांनी व्यक्त केले.
वीररत्न शिवा काशीद यांच्या स्मृतीदिनानिमित्त शनिवार ता.१३ रोजी शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ला येथे अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शिवव्याख्याते शरद नवले व मेजर महावीर तनपुरे यांच्या हस्ते प्रतिमापुजन करण्यात आले. सिद्दी जौहारने शिवाजी महाराजांना कैद करण्यासाठी पन्हाळगडाला वेढा दिला होता.या कैदेतुन राजांची सुटका करण्यासाठी शिवाजी महाराजांचा हुबेहुब वेश परिधान करुन सिध्दी जोहारला भेटण्यासाठी गेलेल्या वीर शिवा काशीद यांना प्राणाचे बलिदान द्यावे लागल्याचा इतिहास आहे.यावेळी शिवव्याख्याते शाहीर शरद नवले यांनी ऐतिहासीक दाखले देत वीर शिवा काशीद यांच्या जीवनकार्यासह,चित्तथरारक प्रसंगासह बलिदानदिनाची माहिती सांगितली.यावेळी मेजर महावीर तनपुरे,सुवर्णकार संघटनेचे मराठवाडा सचिव मनोज चिंतामणी,व्हाईस आॕफ मिडीया जिल्हाउपाध्यक्ष प्रकाश काशीद, तालुकाअध्यक्ष प्रमोद वेदपाठक, विशाल काशीद,सुवर्णकार संघटना तालुकाध्यक्ष मनोज शहाणे,संतोष भालेकर,अॕड अनिकेत काशीद,विरेंद्रबाॕबी काशीद,मयुर डाके,आकाश काशीद,करण काशीद,महेश ऐतवाडे, आदिसह नाभिक समाजातील बांधव नागरीकांची उपस्थिती होती.
स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.