परंडा प्रतिनिधी ता.१४ आज रोजी भोंजा हवेली व कुभेंजा येथे कृषी विभाग व आत्मा विभाग जिल्हा कृषी अधीक्षक धाराशिव आणि तालुका कृषी अधिकारी परंडा यांच्या नियोजनबद्ध खरीप हंगाम करीता पिक प्रात्यक्षिक मुग व तुर बियाणे मोफत ५० लाभार्थी यांना वाटप करण्यात आले. चांगल्या पाऊसाला सुरूवात झाली असून शेतकऱ्यांनी शेंद्रीय शेतीकडे वळावे असे आवाहन केले कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले यावेळी सरपंच समाधान कोळी, उपसरपंच वस्ताद शिवाजी घाडगे, मा चेअरमन आण्णा कोकाटे, सर्जेराव मोरे, डायरेक्टर गणेशदादा नेटके, नवनाथ नेटके, अशोक नेटके, हनुमंत काशीद, देविदास सरवदे, लव्हु जाधव, गणपती कोंडलकर, त्रिंबक मोरे, लव्हू मोरे, अमोल नेटके, प्रविण नेटके, निखिल मोरे, परमेश्वर भांदुर्गे, भाऊ नेटके, शुभाष जाधव, रेवन काशीद इ मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.