स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
मराठा संघर्ष योद्धे श्री.मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपोषण स्थळी अंतरवाली सराटी येथे सरकारचा प्रतिनिधी या नात्याने त्यांची भेट घेऊन चर्चा केली. सरकार आपल्या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक आहे असे उद्गार मनोज दादा जरांगे यांनी काढून पाणी पिऊन उपोषण सोडले.
मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण मिळवून देण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व शासकीय औपचारिकता जलद गतीने पूर्ण करून सकारात्मक निर्णय घेण्यासाठी आपले राज्य सरकार प्रयत्नशील आहे.
एसआईटी चौकशी तसेच मराठा अंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी सरकार सकारात्मक आहे अशी ग्वाही उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे
समाजाला ज्यावेळेस गरज लागेल त्यावेळेस धावून जाणे हे लोकप्रतिनिधी आणि चळवळीतील एक कार्यकर्ता या नात्याने माझे कर्तव्य आहे त्यासाठी मी अखंडपणे कायम प्रयत्नशील असेन.
मनोज दादा जरांगे यांनी आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी त्यांना चांगले आरोग्य मिळावे त्यांच्या लढ्याला यश येवो हीच भगवंत चरणी प्रार्थना केली..!!
यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना.श्री.शंभूराजे देसाई, खासदार श्री.संदिपान भुमरे, आमदार श्री.राणाजगजितसिंह पाटील व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
![]()
![]()

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.