(ED Office)आयुक्त श्री महेशजी लोंढे साहेब  यांची शारदा शैक्षणिक व सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या कार्यालयास सदिच्छा भेट.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

आदरणीय  IRS income tax department (ED Office)आयुक्त श्री महेश जी  दत्तात्रय  लोंढे सर व नायब तहसीलदार (पुणे )सौ मनीषा महेश लोंढे मॅडम काल आमच्या शारदा शैक्षणिक व सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली सोबतच मेघा आरगडे मॅडम (साहेबांची बहीण )बनारस विद्यापीठ काशी मध्ये सध्या प्राचार्य म्हणून कार्यरत असलेले माननीय डॉक्टर नामदेव गपाटे सर  ऑफिस मधील सर्व माझे मित्र सहकारी व पत्रकार बंधू धीरज जी शेळके सर, रियाज पठाण सर यांच्यासोबत भेट दिली.पूजा मुद्दे, संजना शेंडगे, मयुरेश मगर, दिनेश मगर,निलेश मुद्दे, प्रशांत जाधव, दिपक पाटील, संतोष वाघमारे, निलेश नुलवी, प्रसाद फटाले, आत्मजा घोडके यांनी स्वागत केले.
कामगारांच्या सक्षमीकरणासाठी आपण जे काम करत आहोत त्या कामाच साहेबांनी कौतुक केला आहे आज तळागाळातील सर्व कामगारांना प्रत्येक योजनेचा लाभ मिळवून देणे, महिलांसाठी मोफत प्रशिक्षण केंद्र चालू करणे, युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, कामगारांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना सक्षम बनवणे आणि कामगारांच्या उज्वल प्रगतीसाठी  त्यांनी शिक्षण, माध्यम संस्कृतिक व साहित्यिक या क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी करायला हवी, समाजातील विविध क्षेत्रात  काम करणाऱ्या कामगारांना यशस्वी माहिती मिळवून त्यांचे अनुकरण करून विकासाची चळवळ सुरू ठेवलीच पाहिजे, कामगारांच्या एकत्रीकरणासाठी आदर्श व्यक्ती,आणि संघटन कौशल्य असायला हवे असे मत व्यक्त केले आहे. शारदा शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे ऑफिस व ऑफिसमध्ये चाललेले काम  पाहून खूप आनंद झाला…. सर्वांना पुढील कार्याला खूप खूप शुभेच्छा दिल्या.तसेच विनंतीला मान देऊन वेळ देऊन मोलाचे मार्गदर्शन दिल्याबद्दल निलेश मुद्दे यांनी आभार व्यक्त केले.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!