कल्याणसागर विद्यालयाची यशाची परंपरा कायम!
स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
परंडा- येथील कल्याणसागरसमुहातील श्रीकृष्ण बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ,परंडा.संचलित कल्याणसागर माध्यमिक विद्यालय,परंडा तालुका परंडा जिल्हा धाराशिवने यशाची उज्वल परंपरा कायम राखत उत्कर्ष गजानन कोठावळे या विद्यार्थ्याने सर्व विषयात 100% गुणांसह दहावी बोर्ड परीक्षा मार्च 2024 मध्ये राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. विद्यालयातील 63.33%विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. तर 32.22% विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तसेच 2.22% विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयाचा सरासरी निकाल 98.88% लागला आहे.
गुणानुक्रमे विद्यार्थी पुढीलप्रमाणे:
1)कोठावळे उत्कर्ष गजानन-100%
2)सांगळे प्रणव सूर्यकांत-96.20%
3)सुरवसे अथर्व दादासाहेब-96.20%
4)थिटे संस्कार भारत-95.00%
5)नरुटे तेजस सुरेश-94.80%
6)कु.कदम नम्रता संजय-93.60%
7)तरटे किरण बालाजी-93.40%
8)नरुटे प्रणवी महादेव-92.60%
9)जंगाले गौरव लक्ष्मण-91.00%
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. आमदार श्री. सुजितसिंहजी ठाकूर साहेब सचिव.सौ प्रज्ञाताई कुलकर्णी, समूहाचे मार्गदर्शक मा. श्री.विकासजी कुलकर्णी साहेब, नगरपरिषद परंडाचे गटनेते तथा कल्याणसागर माध्यमिक विद्यालय, डोमगावचे मुख्याध्यापक मा.श्री. सुबोधसिंहजी ठाकूर, सरस्वती प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री.चंद्रकांत पवार सर, कल्याणसागर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. किरण गरड सर व सर्व सहशिक्षक श्री मुकुंद भोसले, श्री चंद्रकांत तनपुरे, श्री महादेव नरुटे श्री अजित गव्हाणे श्री रोहित रासकर श्री दादासाहेब सुरवसे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे 💐💐💐💐💐
स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.