डी.बी.ए.समुहच्या वतीने तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती साजरी.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.

परंडा दिनांक 23/ 5/2024 रोजी डी.बी. ए. समुहच्या कुर्डूवाडी  रोड कार्यालयामध्ये  तथागत भगवान गौतम बुद्ध यांची 2567 वी  जयंती साजरी करण्यात आली यावेळी   तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे दीप धूप व वंदना घेऊन पूजन  डी.बी.ए समूहचे संस्थापक /अध्यक्ष माननीय दयानंद बनसोडे, पोलीस पाटील दिलीप परिहार, एडवोकेट दयानंद धेंडे,  अमर गायकवाड, संजय सरवदे, दत्तात्रय पाटील लोहारा, यांनी केले यावेळी  भगवान बुद्ध यांचे  त्रिशरण फलक प्रतिमेचे वाटप केले व तथागत भगवान बुद्ध यांच्या जीवनावर विचार मांडले. तरी उपस्थित धम्मसंदेश परिहार, सम्यक धेंडे, प्रणव साळवे, सूर्योदय  सरवदे,संजय उदागे,इत्यादी बहुसंख्यने
परांडा शहरातील नागरिक व व्यापारी वर्ग उपस्थित होते शेवटी आभार प्रदर्शन माननीय दयानंद बनसोडे यांनी  मांडले

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!