www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
धाराशिव,दि.19 मे 2024 महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री.तुळजाभवानी देविच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगना व इतर राज्यातून भाविक कुलदेवता असल्याने या ठिकाणी कुलाचार व कुलधर्म करण्यासाठी मोठ्या संख्येने येतात.
श्री.देविजीची सिंहासन पुजा ही अत्यंत महत्वाची मानली जातेही सिंहासन पुजा नोंदणी ऑनलाईन पध्दतीने श्री.तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावर https://shrituljabhavani.org उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
जून 2024 मधील सिंहासन पुजा ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात येईल याची सर्व भाविक भक्त,महंत, पुजारी, सेवेकरी व नागरीकांनी नोंद घ्यावी.भाविकांनी सिंहासन पुजा श्री.तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अधिकृत संकेतस्थळ https://shrituljabhavani.org यावरून सिंहासन पुजा पास बुकींग या मेन्युवर क्लिक केल्यानंतर https://shrituljabhavanimataseva.org या लिंकवर प्रवेश करून भाविकांनी आपली सिंहासन पुजेची नोंदणी करावी.
सिंहासन पुजा नोंदणी 21 मे 2024 रोजी सकाळी 10 वाजतापासून सुरू झाली आहे ती 26 मे 2024 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत करता येईल. ऑनलाईन ड्रॉ पध्दतीने प्रथम सोडत व भाविकांना पेमेंटसाठी एसएमएस 27 मे 2024 रोजी 10.30 वाजता पाठविण्यात येतील.भाविकांनी प्रथम सोडतीचे ऑनलाईन पेमेंट 28 मे रोजी सकाळी 10.00 वाजतापर्यंत करावे.
सिंहासन संख्या पूर्ण न झाल्यास ऑनलाईन ड्रॉ पद्धतीने व्दितीय सोडत व भाविकांना पेमेंटसाठी 28 मे 2024 रोजी सकाळी 10.30 वाजेपर्यंत एसएमएस पाठविण्यात येतील.भाविकांनी व्दितीय सोडतीचे ऑनलाईन पेमेंट 28 मे रोजी सकाळी 10.30 ते 29 मे रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत करावे. प्रथम व व्दितीय फेरीत सिंहासन संख्या पूर्ण न झाल्यास ऑनलाईन ड्रॉ पध्दतीने तृतीय सोडत व भाविकांना पेमेंटसाठी 29 मे रोजी सकाळी 10.30 पर्यंत एमएमएस पाठविण्यात येतील. भाविकांनी तृतीय सोडतीचे ऑनलाईन पेमेंट 29 मे रोजी सकाळी 10.30 ते 30 मे रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत करावे.
माहे जून – 2024 या महिन्यातील अंतीम सिंहासन पुजा बुकींग झाल्याची यादी 30 मे रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रसिध्द करण्यात येईल. वरीलप्रमाणे भाविकांनी सिंहासन पुजा नोंदणीचा लाभ घ्यावा.असे आवाहन श्री.तुळजाभवानी मंदिर प्रशासन, तुळजापूर यांनी केले आहे.
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.