स्टार माझा न्यूज :-परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
परंडा ,ता.१४ (प्रतिनिधी ) शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात दुर्गप्रेमी सह्याद्री प्रतिष्ठान धाराशिव ग्रुपच्यावतीने रविवार दि.१२ रोजी वाढलेली काटेरी झाडेझुडपे,अष्टकोनी विहीर,नृसिंह मंदीर परिसर,पथरस्त्यावरील गवताने व्यापलेला परिसरात मोठे परिश्रम घेत स्वच्छता मोहिम राबवुन गडसंवर्धनाचा संदेश दिला.
या मोहिमेत दुर्गप्रेमी तरुणांचा सहभाग होता.
मध्ययुगीन स्थापत्यशास्ञाचा उत्कृष्ट नमुना म्हणुन परंडा भुईकोट किल्ल्याची सर्वदुर मोठी ओळख आहे.आजही या किल्ल्यात मौल्यवान पंचधातु व इतर मोठ्या आकाराचया तोफा व या किल्ल्यात अनेक प्राचीन अवशेष पाहण्यास मिळतात.किल्ल्यातील आतील भागात मुख्य बुरुजासह, ठिकठिकाणी काटेरी झाडेझुडपे वाढलेली आहेत. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत.अनेकजण या सुट्टीत पर्याटनांचा छंद जोपासतात.राज्यभरातुन इतिहासप्रेमी,पर्यटक, शाळेच्या सहली सतत किल्ला पाहण्यास येतात.अशा पर्यटकांसाठी झाडाझुडपांमुळे अडचणीचे होते.रविवारी २० ते २५ बहाद्दर दुर्गप्रेमी युवकांनी सकाळी ९ वाजता परिश्रमास सुरुवात करीत ऐतिहासिक नृसिंह मंदीर व परिसरात, अष्टकोनी विहिरीत उतरुन काटेरी झुडपे हटविली.अतिशय कठिण ठिकाणी साहसी काम दुर्गप्रेमी तरुण करतात.
राज्यातील अनेक गडकोट,भुईकोट किल्ल्यात स्वच्छता मोहिमचे काम सह्यार्दी प्रतिष्ठाण राबवित आहेत. परंडा भुईकोट किल्ला मुख्य बुरुजासह सर्वच बुरुजावर,पथरस्त्यावर दाट काटेरी झाडेझुडपे,मोठमोठे गाजर गवत वाढलेले आहे.पर्यटकांना ही झाडेझुडपे काढल्याशिवाय संपुर्ण किल्ला पाहता येणार नाही अशी दुरावस्था झालेली आहे.धाराशिव सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गप्रेमींनी राज्य पुरातत्व विभागाची लेखी परवानगी घेऊन २५ जणांनी परिश्रम घेत आतील रस्ता स्वच्छता मोहिम राबवुन मोकळा केला आहे. या ग्रुपच्यावतीने इतर गटकोट,भुईकोट किल्ल्यावर स्वच्छता मोहिम हाती घेण्यात येणार असल्याचे दुर्गप्रेमी योगेश कांबळे यांने सांगितले. त्या मोहिमेत धाराशिव सह्याद्री प्रतिष्ठान ग्रुपचे योगेश कांबळे,सतिश मुळुक,जीवन चांडके,चंद्रकांत धुमाळ, सुनील घोगरे,गणेश शिंदे,पंकज गायकवाड, संकेत गायकवाड,ईमाजी गुजले,आदिसह दुर्गप्रेमी तरुणांनी किल्ला स्वच्छतेसाठी सहभाग घेतला होता.
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.