सी-व्हिजिल ॲपवरील तक्रारींची तत्काळ घेतली जातेय दखल.

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

मुंबई उपनगर, दि. 23 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी आणि त्याचा मागोवा घेण्यासाठी निवडणूक आयोगाने सी –व्हिजिल हे (cVIGIL) हे नवीन ॲप सुरू केले आहे. या ॲपच्या माध्यमातून मुंबई उपनगर जिल्ह्यात 16 मार्चपासून ते आतापर्यंत 245 तक्रारी प्राप्त झाल्या. या सर्व तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली. यातील 135 तक्रारींचा भारत निवडणूक आयोगाने विहित केलेल्या मुदतीत निपटारा करण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक कार्यालयाने दिली.
आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे आणि निवडणुका शांततेत आणि मुक्त वातावरणात घेण्याचे भारत निवडणूक आयोगाचे मुख्य उद्द‍िष्ट आहे. आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या अनुचित प्रकारांची तक्रार या ॲपच्या माध्यमातून नागरिकांना थेट ऑनलाईन करता येते. या ॲपमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तक्रारी स्वीकारणे, या तक्रारीवर अवघ्या 100 मिनिटांत कार्यवाही करणे अपेक्षित असते. या पद्धतीने निवडणूक यंत्रणेने आणि सी-व्हिजिल कक्षाने कार्यवाही करून 135 तक्रारींचे निवारण केले. उर्वरित 183 तक्रारींचा मुदतीत निपटारा करण्यात आला.         जिल्ह्यात कुठेही आचारसंहितेचे उल्लंघन होत असेल तर नागरिकांनी तेथील छायाचित्र काढावे आणि तत्काळ सी-व्हिजिल ॲपवर अपलोड करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक कार्यालयाने केले आहे.
सी-व्हिजिल ॲपवर प्राप्त तक्रारींचे स्वरूप
अंधेरी पूर्व-16, अंधेरी पश्चिम-8, अणूशक्तीनगर-7, भांडूप पश्चिम-5, बोरीवली-13, चांदिवली-26, चारकोप-14, चेंबुर-14, दहिसर-8, दिंडोशी-5, घाटकोपर पूर्व-3, घाटकोपर पश्चिम-2, गोरेगाव-10, जोगेश्वरी पूर्व-5, कलिना-8, कांदिवली पूर्व-8, कुर्ला-5, मागठाणे-24, मालाड पश्चिम -11, मानखुर्द शिवाजीनगर-1, मुलुंड -16, वांद्रे पूर्व-7, वांद्रे पश्चिम-8, वर्सोवा-3, विक्रोळी-16, विलेपार्ले-5 अशा एकुण 245 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!