मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या १११ व्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज  पठाण 9405749898 / 9408749898
श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ व यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या १११ व्या जयंतीनिमित्त  कर्मवीर प्रज्ञाशोध परीक्षा अंतर्गत रंगभरण व निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला.

पहिली ते दुसरी रंगभरण स्पर्धा
प्रथम क्रमांक- कुमारी बनसोडे यशस्वी अनिल जिजामाता विद्या मंदिर बार्शी
द्वितीय क्रमांक- आतर मदीया कर्मवीर बाल विद्यामंदिर धाराशिव,
तृतीय क्रमांक- कुमारी अमृतकर उन्नती कैलास जिजामाता विद्या मंदिर बार्शी,

इयत्ता तिसरी चौथी रंगभरण स्पर्धा  प्रथम क्रमांक- स्वराज मोरे महात्मा फुले विद्यामंदिर बार्शी,
द्वितीय क्रमांक- मोरे ईश्वरी संदिप जिजामाता विद्या मंदिर बार्शी, तृतीय क्रमांक- कुमारी शेख मिजबा रिजवान कर्मवीर बाल मंदिर धाराशिव,

इयत्ता पाचवी ते सातवी गटातील निबंध स्पर्धा विजेते- प्रथम क्रमांक- कुमारी करडे सिद्धी महाराष्ट्र विद्यालय बार्शी, द्वितीय क्रमांक- कुमारी पाटील सुदिक्षा जिजामाता विद्या मंदिर बार्शी, कुमारी जगदाळे गौरी तृतीय क्रमांक कर्मवीर विद्यालय चारे,

इयत्ता आठवी नववी गटातील निबंध स्पर्धेतील विजेते- प्रथम क्रमांक- कुमारी छबिले अनुजा सचिन छत्रपती शिवाजी विद्यालय वाशी, द्वितीय- क्रमांक कुमारी गुंड तनिष्का काकासाहेब महाराष्ट्र विद्यालय बार्शी, तृतीय क्रमांक कुमारी पटेल तंजीला जनता विद्यालय येडशी.

इयत्ता अकरावी गटातील निबंध स्पर्धेतील विजेते- प्रथम क्रमांक -कुमारी कांदे अपेक्षा  कर्मवीर विद्यालय चारे, द्वितीय क्रमांक कुमारी कचरे पूर्वा ,जनता माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय येडशी, कुमारी मोहिते ज्योती तृतीय क्रमांक शिवाजी महाविद्यालय बार्शी.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. वाय.यादव हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठाचे इतिहास संशोधन मंडळाचे चेअरमन प्रा.डॉ. चंद्रकांत चव्हाण हे होते. सोबत यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र सोलापूर चे सचिव दिनेश शिंदे,न.पा. बार्शीचे प्रशासन अधिकारी ,संस्थेचे उपाध्यक्ष नंदनजी जगदाळे,संस्थेचे सचिव पी.टी.पाटील, संस्थेचे सहसचिव ए.पी. देबडवार, संस्थेचे खजिनदार तथा यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र सोलापूरचे सदस्य जयकुमार शितोळे,संस्थेचे सदस्य माजी प्राचार्य सी.एस. मोरे, संस्थेचे सदस्य बी.के.भालके,प्रा.किरण गाढवे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे खजिनदार तथा यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र सोलापूरचे सदस्य जयकुमार शितोळे यांनी केले यामध्ये त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या विषयी माहिती दिली आणि यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र सोलापूर यांच्या अंतर्गत संस्थेतील विविध कार्याविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.बी.वाय.यादव यांनी यशवंतराव चव्हाण व डॉ. मामासाहेब जगदाळे यांचे ऋणानुबंध सांगितले.
डॉ.चंद्रकांत चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त करताना यशवंतराव चव्हाण यांच्या विविध क्षेत्रातील कार्यांची सखोल माहिती दिली.
याप्रसंगी प्रा.दिनेश शिंदे यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र सोलापूरचे सचीव,सचिन छबिले व प्रा.हनुमंत काळे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
विविध गटातून घेतले गेलेल्या रंगभरण व निबंध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद कसबे व प्रमोद जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन राहुल काकडे यांनी केले.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!