शिर्डी व सोलापूर  लोकसभा रिपाईला सोडा – संजयकुमार बनसोडे

starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज:- परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.

परंडा :शिर्डी व सोलापूर या दोन लोकसभा मतदार संघावर महायुतीतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले गट ) चा हक्क असून या दोन्ही जागा रिपाईला सोडण्यात याव्यात . शिर्डी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी रिपाईचे अध्यक्ष खा . रामदास आठवले यांना द्यावी . अशी मागणी रिपाईचे प्रदेश चिटणीस संजयकुमार बनसोडे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे . जर या दोन जागा सोडल्या नाही तर आम्ही वेगळा विचार करू असे ही बनसोडे
यांनी यावेळी म्हटले आहे . परंडा शहरातील डॉ .बाबासाहेब आंबेडकर चौकातील रिपाई पक्ष कार्यालयात सोमवार ( दि .१८ ) बनसोडे यांनी
पत्रकार परिषद घेतली . यावेळी आयटी सेल जिल्हाध्यक्ष आकाश बनसोडे ,तालुका संपर्कप्रमुख दादा सरवदे , संजीवन भोसले , संदीप दाभाडे , तात्या शेलार उपस्थित होते . पुढे बोलताना बनसोडे म्हणाले की , पक्षाने महायुतीकडे ४ जागांची मागणी केलेली असून यामधील प्रामुख्याने शिर्डी व सोलापूर हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ आरक्षीत आहेत . तसेच या मतदार संघात पक्षाची ताकद मोठी आहे . त्यामुळे रिपाईसाठी या दोन्ही जागा महायुतीतील मित्रपक्षांनी द्याव्यात . अन्यथा वेगळा विचार केला जाईल .

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!