भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्त डी बी ए समूहच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन.

starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज :-परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.

डी बी ए समूहच्या वतीने सालाबादाप्रमाणे भारतरत्न,विश्वरत्न,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने भव्य दिव्य साजरी होणार
परंडा येथे डी.बी.ए समूहच्या वतीने सालाबादप्रमाणे आयोजित भारतरत्न, विश्वरत्न,बोधिसत्व, परमपूज्य,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133 व्या जयंतीनिमित्त डी.बी.ए. समूहाचे संस्थापक/ अध्यक्ष माननीय दयानंद बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली डी.बी.ए समूह कार्यालय कुर्डूवाडी रोड येथे बैठक होऊन 14 एप्रिल 2024 रोजी आठवडा बाजार ठिकाणी परंडा येथे जयंती साजरी करण्यात येणार आहे यावेळी जयंती कमिटीच्या अध्यक्षपदी महावीर बनसोडे यांची एक मतांनी निवड झाली तर उपाध्यक्षपदी अमर गायकवाड यांची निवड झाली व यावेळी बैठकीमध्ये ठराव घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डी बी ए बचत गट काढण्याचे ठरले,व विविध सांस्कृतिक कार्यक्रम,निराधार महिलांसाठी साडी वाटप,गोरगरीब हुशार गुणवत्ताधारक, विद्यार्थ्यांसाठी स्कूल बॅग, वही पेन, शालेय साहित्य वाटप, आरोग्य रुग्णालयामध्ये फळ, वाटप व इमारत बांधकाम कामगार महामंडळ मोफत माहिती व मार्गदर्शन केले जाईल. इ कार्यक्रम आयोजित केले आहेत यावेळी पोलीस पाटील दिलीप परिहार, एडवोकेट दयानंद धेंडे, पत्रकार रणधीर मिसाळ, सरपंच चंद्रकांत परिहार, बौद्धाचार्य मनोज सिंगनाथ, वंचित बहुजन आघाडी प्रदीप परिहार, सतीश दाभाडे,संभाजी थोरात, दयानंद दाभाडे, सामाजिक नेतेआभिमान सुतार,धम्म संदेश परिहार, परंडा शहरातील भीमसैनिक व नागरिक बहुसंख्य उपस्थित होते शेवटी आभार मा,दयानंद बनसोडे यांनी मांडले

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज  पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!