माजी उपसरपंच अमोल जगताप यांचा ठाकरे गटात प्रवेश

starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज:-परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
खासदार राजेनिंबाळकर, जिल्हाप्रमुख रणजित पाटील यांनी  बांधले शिवबंधन ; सावंत गटाला धक्का


परंडा : सावंत गटाचे आसू येथील माजी उपसरपंच अमोल रमेश जगताप यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व जिल्हाप्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांच्या उपस्थितीत आसू गावात शिवबंधन बाधत ठाकरे गटात प्रवेश केला. त्यामुळे सावंत गटाला आसू गावात भगदाड पडले आहे.

          मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बंडानंतर सावंत गटात जोरदार इशकमिंग सुरू होते. तर ठाकरे गटात आऊटगोईंग सुरू होते. परंतु आता शिंदे गटातून आऊटगोईंगला सुरूवात झाली आहे. विशेष म्हणजे शिवसेनेतील बंडाळीला दोन वर्षे झाले आहेत. या कालावधीत परंडा तालुक्यातील माजी ज्ञानेश्वर पाटील यांच्या गटातील अनेक पदाधिकारी पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या गटात गेले होते. परंतु शनिवारी, आसूचे माजी उपसरपंच अमोल रमेश जगताप यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, शिवसेना धाराशिव जिल्हाप्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील व तालुकाप्रमुख मेघराज पाटील यांच्या हातून शिवबंधन बांधत पक्षप्रवेश घेण्यात आला. त्यांच्यासमवेत अनेकांनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. त्यात अविनाश जगताप, नवनाथ जगताप, शरद नलावडे, विद्यमान सोसायटी संचालक चंद्रकांत घोंगडे, महादेव जगताप, संतोष जगताप, भरत जगताप, हनुमंत जगताप, शरद नलावडे, गोकुळदास जगताप, अनंता भोसले, परमेश्वर लंकेश्वर यांच्यासह आदींचा समावेश आहे. यावेळी माजी  जिल्हा परिषद सदस्य शंकर इतापे, शिवसेना परंडा शहराध्यक्ष रईस मुजावर, मधुकर गायकवाड, डॉ.अब्बास मुजावर, इरफान शेख,विकास यादव, विकास जाधव ,धनाजी यादव, संतोष बुरंगे ,समाधान जाधव ,बालाजी यशवंत, भालेराव यशवद, अमोल नलवडे, अनंता बुरंगे, पुंडलिक खुणे,संजय यशवंद ,तात्या भोसले , दिगंबर माने आदी उपस्थित होते.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!