(महाराष्ट्रातील ज्येष्ठ शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सदर पुरस्काराने सन्मानित )
स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी डॉ शहाजी चंदनशिवे.
परांडा दि . 14 फेब्रुवारी 2024 येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव अंतर्गत शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परंडा येथील ग्रंथपाल डॉ राहुल किशनराव देशमुख यांना नुकताच मराठवाडा विभागीय संघ आणि स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालय पूर्णा जिल्हा परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 6 फेब्रुवारी 2024 रोजी पूर्णा येथे मराठवाडा राज्यस्तरीय ग्रंथालय कार्यशाळेचे आयोजन केले होते या कार्यशाळेमध्ये ज्येष्ठ कवी प्रा डॉ इंद्रजीत भालेराव ग्रंथालयात सर्वत्र अर्पण करणारे माननीय माजी आमदार गंगाधर पटणे सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे विभाग प्रमुख डॉ राजेंद्र कुंभार राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे येथील प्राचार्य डॉ नंदकुमार दहिभाते विभागीय सहाय्यक ग्रंथालय संचालक डॉ सुनील हुसे डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर येथील माजी ग्रंथपाल डॉ धर्मराज वीर पूर्णा येथील डॉ भन्ते उपयुक्त महाथेरो व अकोला येथील राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ गजानन काटेवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ राहुल देशमुख यांना राज्यस्तरीय उत्कृष्ठ ग्रंथपाल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले . त्यांना मिळालेल्या या यशामुळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव यांनी संस्थेच्या व महाविद्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी उपप्राचार्य डॉ महेशकुमार माने स्टाफ सेक्रेटरी तथा सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे प्रा डॉ संतोष काळे प्रा डॉ विशाल जाधव प्रा विजय जाधव प्रा रणजीत वर्पे यांची उपस्थिती होती .
कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा डॉ शहाजी चंदनशिवे यांनी केले होते . यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा डॉ शहाजी चंदनशिवे यांनी केले . सत्काराला उत्तर देताना डॉ राहुल देशमुख यांनी सांगितले की मला या पुरस्कारामुळे प्रोत्साहन मिळाले आहे .
मी आतापर्यंत जे ग्रंथपाल म्हणून प्रामाणिक ग्रंथालयाचे काम केले आहे यापेक्षाही अजून जोमाने काम करून ग्रंथालयाच्या माध्यमातून मी या महाविद्यालयाचे नाव आणखीन उंचावेन . अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ सुनील जाधव यांनी सांगितले की प्राध्यापकांनी प्रामाणिकपणे दिलेली जबाबदारी पूर्ण केल्यास त्या कामाचा अप्रत्यक्ष लेखाजोखा केला जातो आणि अशा प्रामाणिक प्राध्यापकांना कर्मचाऱ्यांना विविध शैक्षणिक सामाजिक संस्था पुरस्कार देऊन सन्मानित करतात . अशाच पद्धतीने सर्वांनी आपली जबाबदारी पूर्ण करावी व स्वतःचे आणि महाविद्यालयाचे नाव महाराष्ट्रभर करावे .शेवटी डॉ महेशकुमार माने यांनी कार्यक्रमाचे आभार मानले .
डॉ राहुल देशमुख यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव या संस्थेचे सचिव संजय बप्पा निंबाळकर धाराशिव संस्थेचे अध्यक्ष सुनिल शिंदे तसेच मराठवाड्यातील अनेक महाविद्यालयाच्या प्राचार्य प्राध्यापक आणि शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मित्र परिवारांनी डॉ राहुल देशमुख यांचे अभिनंदन व कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.