सातत्यपूर्ण परिश्रम हाच यशाचा राजमार्ग – डॉ तुळशीराम उकिरडे.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
(डॉ उकिरडे यांच्या संघर्षमय कहाणीने  सर्व स्वयंसेवक झाले भावनांश
श्री बापू जबडे यांनी बालविवाह प्रतिबंध जनजागृती या विषयावर प्रा डॉ गजेंद्र रंधील यांनी महात्मा फुले यांचे सामाजिक कार्य आणि  डॉ हरिश्चंद्र गायकवाड यांनी ग्राम विकासात  युवकांचे योगदान या विषयावर राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना केले मार्गदर्शन . )
परंडा प्रतिनिधी
परांडा दि . 12 फेब्रुवारी 2024 सातत्यपूर्ण परिश्रम हाच यशाचा राजमार्ग होय विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे परिश्रम केल्यास हमखास यश मिळते तेव्हा जीवनात अनेक प्रसंग येतील परंतु प्रत्येक प्रसंगाला तोंड देत संघर्ष करत जो विद्यार्थी पुढे जातो तोच यशस्वी होतो . राष्ट्राच्या सेवेसाठी देशाच्या प्रगतीसाठी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सज्ज राहायचे आहे तरच देशाची प्रगती शक्य आहे . असे प्रतिपादन तेरणा महाविद्यालय धाराशिव येथील प्रा डॉ तुळशीराम उकिरडे यांनी मौजे आंदोरा तालुका परांडा येथे शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे  शिंदे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले .ते राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते . व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे उपस्थित होते . व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून डॉ विद्याधर नलवडे कार्यक्रमाधिकारी प्रा अमर गोरे पाटील प्रा डॉ कृष्णा परभणे सह कार्यक्रमाधिकारी डॉ अरुण खर्डे प्रा डॉ  सचिन चव्हाण प्रा रणजीत वर्पे यांची उपस्थिती होती .
      पुढे बोलताना डॉ उकिरडे म्हणाले की जीवन जगत असताना आजूबाजूला नकारात्मक विचार करणारे अनेक पावलोपावली लोक भेटतात त्यांना शिक्षणाचा विषय काढला की वाटते शिकून काय उपयोग परंतु समाजामध्ये असे पण काही लोक आहेत की त्यांची प्रेरणा घेतल्यानंतर जीवन जगावेसे वाटते जगामध्ये जो इतिहास घडवला तर केवळ शिक्षणामुळे आज देशात अनेक साहित्यिक शास्त्रज्ञ किंवा शिक्षणामुळे तयार झाले आहेत तेच आमचे प्रेरणा स्त्रोत आहेत विद्यार्थ्यांनी या देशातील महापुरुषांचे विचार आत्मसात करून त्यांची प्रेरणा घेऊन स्वतःचे जीवन सुजलाम-सुफलाम करावे .प्रा डॉ शहाजी चंदनशिवे यांनी अध्यक्ष समारोप करताना आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना सांगितले की  कोणत्याही व्यक्तीला संघर्ष केल्याशिवाय कष्ट केल्याशिवाय  काहीही मिळत नाही राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांचे जीवन घडविते विद्यार्थ्यांना श्रम संस्कार देते त्यामुळे विद्यार्थी घडतात विद्यार्थ्यांना कष्ट करण्याची सवय लागते अनेक जाती धर्माच्या विद्यार्थ्याबरोबर एकत्र राहुन एकतेची भावना निर्माण होते . या शिबिरामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये अनेक बदल होतात .
      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा रणजीत वर्पे यांनी केले . प्रास्ताविक प्रा डॉ सचिन चव्हाण यांनी केले तर आभार कु . जेतवनी मिसाळ या स्वयंसेविकेने मानले .

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!