महाराष्ट्र विद्यालयाचे NMMS परीक्षेमध्ये घवघवीत यश.

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

बार्शी प्रतिनिधी.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत २४ डिसेंबर २०२३ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक (एन.एम.एम.एस) शिष्यवृत्ती
परीक्षेत महाराष्ट्र विद्यालयातील एकूण १५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.एकाच शाळेतील एवढे जास्त प्रमाणात उत्तीर्ण झालेली बार्शी तालुक्यातील पहिली शाळा.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना श्री.सचिन देशमुख, श्री.सुरेश डिसले,श्री.संग्राम देशमुख व श्री.सुजीत लोखंडे यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ.बी.वाय. यादव,उपाध्यक्ष एन.एन. जगदाळे, संस्थेचे सचिव तथा शाळा समितीचे अध्यक्ष पी.टी.पाटील, सहसचिव तथा शाळा समितीचे सदस्य श्री.ए.पी.देबडवार, संस्थेचे खजिनदार श्री.जयकुमार शितोळे,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री. व्ही.एस.पाटील,बी.के.भालके सर्व कार्यकारिणी सदस्य व सर्व संस्था सदस्य, विद्यालयाच्या प्राचार्या के.डी.धावणे,उपमुख्याध्यापक श्री.आर.बी. सपताळे, पर्यवेक्षक श्री.एस.सी.महामुनी,पर्यवेक्षिका श्रीमती एन.बी.साठे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!