कामगाराची मुलगी बनली उपजिल्हाधिकारी.

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.comस्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

बार्शी – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या लागलेल्या निकालात यंदा ही बार्शीची सरशी पाहायला मिळाली. बार्शी तालुक्यातील तरुणाईनेही यंदाच्या स्पर्धा परीक्षेतून यश संपादन केलं आहे. तालुक्यातील सासुरे गावची अंकिता विकास ताकभाते हिने उपजिल्हाधिकारीपदाला गवसणी घातली. अंकिताने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात १४६ वी तर महिलावर्गात तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन यश मिळवले आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वच ठिकाणाहून तिचं कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे.

अंकिताचे वडिल हे साखर कारखन्यातील कामगार असून कुमठे येथील श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्यात ते गेली अनेक वर्षे कामगार म्हणून कार्यरत आहेत. अंकिता ताकभाते ही महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन उपजिल्हाधिकारी झाल्यामुळे आई-वडिलांच्या कष्टाचं तिने चीज केल्याची भावना ग्रामस्थांकडून होत आहे. अंकिताच्या या यशाबद्दल खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही तिचे अभिनंदन केले आहे.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!