वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय नेते ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांची धाराशिव येथे दि . २४ जानेवारी रोजी महासभा

starmazanews

starmazanews

( आरक्षण बचाव ओबीसी महा एल्गार मेळावा मार्गदर्शन करणा रनेक दिग्गज वंचित बहुजन आघाडी मध्ये ॲड . बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये करणार प्रवेश . )

स्टार माझा न्यूज प्रतिनिधी डॉ शहाजी चंदनशिवे.
परांडा दि . 23 जानेवारी 2024 वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी धाराशिव येथे आयोजित केलेल्या आरक्षण बचाव ओबीसी महाएल्गार सभेमध्ये उपस्थितांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत .या महाएलगार मेळाव्यामध्ये जिल्हयातून व मराठवाड्यातून अनेक ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत . धाराशिव येथे दुपारी तीन वाजता या सभेची सुरुवात होणार आहे .तेव्हा या मेळाव्यासाठी जिल्ह्यातून लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडी धाराशिव जिल्हा अध्यक्ष बी डी शिंदे जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के जिल्हा महासचिव बाबासाहेब जानराव महिला आघाडी जिल्हाध्यक्षा अनुराधा लोखंडे युवक आघाडी जिल्हाध्यक्ष शितल चव्हाण व फुले आंबेडकर विद्वत सभा महाराष्ट्र राज्याचे समन्वयक डॉ शहाजी चंदनशिवे यांनी केले आहे .या मेळाव्यासाठी ओबीसी चे मराठवाडा व राज्यस्तरीय नेते तसेच वंचित बहुजन आघाडीचे राज्यातील प्रमुख नेते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे .

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!