स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
परंडा,ता.२० (प्रतिनिधी) चांदणी विद्यालय आसू ता.परंडा येथे कार्यरत कलाशिक्षक डी. के. खंडागळे यांना महाराष्ट्र राज्य कला अध्यापक संघ महामंडळ यांच्या वतीने आदर्श कलाशिक्षक पुरस्कार देऊन सत्कार गौरव करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य कला अध्यापक संघ महामंडळाचे राज्य अधिवेशन शुक्रवार ता.१९ रोजी बोर्डी ता.डहाणु जि.पालघर येथे आयोजित करण्यात आले होते.या अधिवेशनात डी.के .खंडागळे यांना जगविख्यात मुर्तीकार भगवान रामपुरे यांच्या हस्ते राज्यस्तरीय आदर्श कलाशिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. खंडागळे यांचे सामाजिक, कला व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य आहे. सतत परिसरातील विद्यार्थ्यांना आर्टबाबत मार्गदर्शन व सहकार्य करत असतात. अनेक विद्यार्थ्यांनी कलाक्षेत्रामध्ये प्राविण्य मिळवले आहे. खंडागळे यांचे कलाक्षेत्रातील कार्य अतिशय उल्लेखनीय आहे. याबद्दल संस्था सचिवा श्रीमती विमल भातलवंडे, मुख्याध्यापक श्री. भांडवलकर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, धाराशिव जिल्हा कलाशिक्षक महासंघ, सहकारी कलाशिक्षक एस.पी. पवार, परंडा तालुका कलाशिक्षक महासंघ यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898


Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.