रुग्ण हक्क सेवा समितीचा पदग्रहण समारंभ व बागवान सोशल फाउंडेशनच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन.

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

बार्शी ( प्रतिनिधी ) बार्शी येथील सामाजिक सेवेतील अग्रेसर बागवान सोशल फाउंडेशन संस्थेच्या वतीने दिनदर्शिका चे प्रकाशन रुग्ण हक्क संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष अँड निलेश करमुंडी लातूर यांच्या हस्ते बार्शी येथील जमजम फंक्शन हॉल या ठिकाणी दिनदर्शिका चे प्रकाशन करण्यात आले.
तसेच या कार्यक्रमात रुग्ण हक्क संरक्षण समिती शाखेचे बार्शी शहर ची स्थापना होऊन या ठिकाणी शहर व तालुक्यातील विविध समाजातील समाजसेवा करणाऱ्या समाजसेवक व समाज सेविकाना समाजातील गरजूंना रुग्णसेवेत सहकार्य करण्याच्या उद्देशाने पदे देण्यात आली.
बागवान सोशल फाउंडेशनच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष एडवोकेट निलेश करमुंडी यांनी भूषवले.
या कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्हा रुग्ण संरक्षण समिती अध्यक्ष सुमित भांडेकर, जिल्हा उपाध्यक्ष राहुल भरले, सोलापूर शहराध्यक्ष कुणाल धोत्रे, बापू घोलप , मुस्लिम एकता संघटनेचे अध्यक्ष आशिफभाई जमादार भुम, चंद्रमणी भाऊ गायकवाड ऑल इंडिया मराठवाडा कार्याध्यक्ष, एडवोकेट प्रसाद एडके, एडवोकेट कुलदीप शिरसागर, बार्शी ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर शितल बोपलकर मॅडम, बार्शी बागवान समाज चे अध्यक्ष मुसा चौधरी बागवान, मुस्लिम बिरादरी जमात चे अध्यक्ष आयुब भाई शेख ,येडसीकर
सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष जहांगीर भाई येडशीकर, चित्रपट कलाकार दिपक आवाळ, सतीश पालंके, आबोली पालके, आ.भा. नाटय परीषद, वृक्षवर्धन समितीचे अध्यक्ष उमेश काळे, मुस्लिम समता परिषद चे अध्यक्ष सरफराज शेख, टिपू सुलतान फाउंडेशनचे अध्यक्ष इरफान भाई बागवान, युवासेना जिल्हा उपप्रमुख हेमंत रामगुडे, सामाजिक कार्यकर्ते इब्राहिम भाई काजी , जावेद पठाण,रा.का.चे महिला जिल्हाध्यक्ष सुवर्णाताई शिवपुरे मॅडम, रज्जाक शेख, इ मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बागवान सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष जुबेर बागवान, उपाध्यक्ष अन्वर बागवान, सचिव पत्रकार कदीर बागवान , पत्रकार संगीता ताई पवार, वैशालीताई ढगे, सुनंदाताई चव्हाण, रेखाताई सरवदे, प्रमिलाताई झोंबाडे, डिजिटल मीडिया प्रेसक्लबचे पत्रकार रियाज पठाण, आजम बागवान, पत्रकार तानाजी घोडके, निलेश झिंगाडे, बादशाह बागवान ,इरफान बागवान, एजाज शेख, रफिक शेख , युसुफ जमादार, विशाल तोडकरी, नेताजी शिंगनाथ, सिकंदर बागवान, व असंख्य युवक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पत्रकार कदीर भाई बागवान यांनी व्यक्त केले.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!