www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
दिनांक ३०/१२/२०२३ रोजी पुणे येथे आयोजित आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धा स्मार्ट किड्स अबॅक स प्रा. लि. यांच्यावतीने आयोजित केली होती. या स्पर्धेत बार्शी शहरातील गौरवदीप अबॅकस क्लासेसचा विद्यार्थी उत्क्रांत उमाकांत ठोकळ याने प्रथम क्रमांक मिळवला तर अभिजीत काळे आणि श्रुती कांबळे यांनी दुसरा क्रमांक मिळवला. हे यश मिळवण्यासाठी अबॅकस शिक्षिका दिपमाला जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. यांच्या यशाबद्दल सर्वच स्तरांतून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तसेच पुणे येथे स्मार्ट किड्स अबॅकस कोल्हापूर च्या वतीने दिला जाणारा सर्वोत्कृष्ट बेस्ट फ्रेंचाईज पुरस्कार दिपमाला जाधव यांना मिळाला. ही स्पर्धा पुणे येथील नरहे येथे भरवण्यात आली होती. या स्पर्धेत देशातील २७ राज्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.