कुख्यात गुंड शरद मोहोळचा मृत्यू; भर दिवसा झाला गोळीबार

starmazanews

starmazanews


स्टार माझा न्यूज:-पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर.
पुणे:-दि. ५ पुण्यातील कुख्यत गुंड शरद मोहोळ याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शुक्रवार दिनांक ५ कोथरूड परिसरातील सुतारदरा येथे भर दिवसा त्याच्यावर तीन ते चार हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या होत्या. त्यातील एक गोळी त्याला लागली होती. शुक्रवारी दुपारी दीड वाजायच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या तीन ते चार हल्लेखोरांनी शरद मोहोळ याच्यावर गोळ्या झाडल्या हल्लेखोरांनी तीन गोळ्या झाडल्या असल्याची माहिती मिळाली आहे. त्यातील एक गोळी त्याच्या खांद्याला लागली होती. जखमी शरद मोहोळ याला कोथरूड परिसरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचार यादरम्यान शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजायच्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांचा मोठा फौज फाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. त्यावरून आरोपींची ओळख पटवून आरोपींचा माग काढण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. शरद मोहोळ हा पुणे येथील कुख्यात गुंड होता. मुळशी तालुक्यातील एका सर्वसामान्य कुटुंबात तो वाढला होता गुंड संदीप मोहोळ याचा ड्रायव्हर म्हणून त्याने गुन्हेगारी क्षेत्रात पदार्पण केले होते. संदीप मोहोळ यांची हत्या झाली त्यानंतर शरद याने स्वतःची गुन्हेगारी टोळी बनवून गुन्हे करण्यास सुरुवात केली .त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण याच्यासारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. टोळी युद्धातून त्याने साथी दारासोबत गणेश मारणे टोळीतील पिंटू मारणे याचा खून केला होता. त्यात त्याला अटक झाली होती. त्या खटल्या त्याला जामीन मिळाला असता त्याने लावासा प्रकरणातील दासवे येथील सरपंच शंकर दिंडले यांचे अपहरण केले होते. त्या गुन्ह्यात देखील त्याला पुन्हा अटक झाली होती. एका गुन्ह्यात येरवडा कारागृहात असताना त्याने कातिल सिद्दिकी याचा खून केला होता. कातिल सिद्दिकी हा दहशतवाद्याच्या आरोपावरून येरवडा कारागृहात होता. त्याच्यासोबत किरकोळ कारणावरून वाद झाल्याने शरद मोहोळ याने त्याचा खून केला होता. सिद्दिकी खून खटल्यात पुराव्या अभावी त्याची निर्दोष सुटका झाली होती. सन 2022 मध्ये त्याला पुणे पोलिसांनी सहा महिन्यासाठी तडीपार देखील केले होते. शरद मोहोळ यांच्या लग्नाचा शुक्रवारी वाढदिवस होता. तो घरी असताना काही हल्लेखोर त्याच्या गल्लीत दबा धरून बसले होते. घरातून बाहेर येतात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी हा प्रकार घडला असून त्यातच कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा मृत्यू झाला आहे.

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!